मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सीईओ यांचा राजीनामा काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. त्यांनी २७ डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. आता बीसीसीआयमधील आणखी एका अधिकाऱ्याने राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे.

वाचा-
माजी क्रिकेटपटू आणि बोर्डाचे संचालक यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. करीम डिसेंबर २०१७ साली बोर्डाच्या कामकाजात आले होते. तत्कालीन सीईओ जोहरी यांच्यासोबत मिळून करीम यांनी अनेक नियुक्त्या केल्या होत्या.

वाचा-
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने जोहरी यांचा राजीनामा अचानक मंजूर केला होता. त्यांनी राजीनामा देऊन सहा महिने झाले होते. बीसीसीआयने अचानक राजीनामा का स्विकारला हे समजू शकले नाही. जोहरी यांचा करार २०२१ पर्यंत होता. सौरव गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर जोहरी यांनी राजीनामा दिला होता.

जोहरी यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर एका आठवड्यात करीम बीसीसीआयच्या बाहेर का पडले? यामागचे कारण काय? कोण जबाबदार? याबद्दल अद्याप काही समजू शकले नाही.

वाचा-
५२ वर्षीय सबा करीम यांनी निवड समितीत देखील काम केले आहे. त्यांनी भारतीय संघाकडून १ कसोटी आणि ३४ वनडे खेळल्या. प्रथम श्रेणीत त्यांनी १२० सामन्यातून ७ हजार ३१० धावा केल्या त्यात २२ शतक आणि ३३ अर्धशतकांचा समावेश होता.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here