FIFA World Cup : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमान कतारला मोठा धक्का धक्का बसला. कारण पहिल्याच सामन्यात त्यांना इक्वेडोरने २-० असे पराभूत केले. हे दोन्ही गोल इक्वेडोरच्या एनर व्हॅलेनसियाने केले. हे दोन्ही गोल पहिल्याच सत्रात झाले आणि तिथेच इक्वेडोरने विजयाचा पाया रचला. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकताना जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत.FIFA World Cup : पहिल्याच सामन्यात यजमान कतारचा दारुण पराभव, इक्वेडोरची विजयी सलामी


सौजन्य-ट्विटर

सौजन्य-ट्विटर
पहिला गोल झाल्यावर इक्वेडोरचे आपले आक्रमण वाढवले. कारण पहिल्या गोलनंतर त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले होते. त्यामुळे येत्या काही मिनिटांमध्ये दुसरा गोल करण्याचे स्वप्न इक्वेडोरचा संघ बघत होता. पण दुसरीकडे कतारही आक्रमण करत गोलबरोबरी करण्यासाठी प्रयत्न करत होता. पण या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळाले नाही. कारण आक्रमण करत असताना त्यांनी आपल्या बचावावर जास्त लक्ष दिले नाही आणि हीच गोष्ट इक्वेडोरच्या संघाने हेरली. इक्वेडोरच्या संघाने कतारच्या खेळाडूंना काही काळ आपल्या खेळात गुंतवून ठेवले आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी चाल खेळली. कतारचा संघ आक्रमणासाठी आतूर असताना इक्वेडोरच्या संघाने आक्रमणाला अधिक धार आणली आणि त्यांना दुसरा गोल करण्यात यावेळी यश मिळाले. पुन्हा एकदा व्हॅलेनसियाने इक्वेडोरचा यश मिळवून दिले. व्हॅलेनसियाचा हा या सामन्यातील दुसरा गोल ठरला, त्याच्या खेळातील चपळता यावेळी नजरेचे पारणे फेडणारी होती. कारण कतारच्या गोलपोस्ट जवळ जेव्हा तो आला तेव्हा त्याने गोल करण्याचे मनसुबे स्पष्टपणे दाखवले होते आणि यामध्ये तो यशस्वी ठरला.
सामन्याच्या पहिल्याच सत्रात इक्वेडोरने कतारला दोन धक्के दिले होता. पहिला गोल १६व्या तर दुसरा गोल त्यानंतर १५ मिनिटांनी म्हणजेच ३१व्या मिनिटाला केला. त्यामुळे पहिल्या सत्रातच इक्वेडोरने विजयाचा पाया रचला होता. दुसऱ्या सत्रात मात्र इक्वेडोरने सावधपणे खेळ केला आणि आपल्याविरुद्ध गोल कसा होणार नाही, याची चोख काळजी त्यांनी घेतली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times