नवी दिल्ली: देशात करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ हजारावर पोहोचली आहे. या जीवघेण्या आजारावर अनेकांनी मात केली. करोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. अशात काही डॉक्टर आणि नर्स यांना करोनाची लागण झाली. करोना वॉरिअर्स म्हणून अनेक जण काम करत आहेत. अशाच एका करोना वॉरिअरचे कौतुक भारताच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे.

वाचा-
मणिपूरमधील एका महिला रिक्षा चालकाने करोना व्हायरसवर मात केलेल्या नर्सला १४० किलोमीटरचा प्रवास करून घरी सोडले. इंफाळची महिला रिक्षा चालक या महिलेचे भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

इफाळ येथील एका नर्सला करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यावर यशस्वी मात केली. रुग्णालयातून सोडल्यानंतर तिला घरी जायचे होते. रात्रीच्या वेळी महिला रिक्षा चालक लाइबी ओइनमने या नर्सला रात्रीचा प्रवास करत १४० मीटर अंतर पार करत घरी सोडले. लाइबीने सुरक्षितपणे घरी सोडले. लाइबीच्या निस्वार्थ सेवेला सलाम, असे लक्ष्मणने म्हटले आहे.

वाचा-
ही घटना तेव्हाची आहे जेव्हा देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. इफाळमधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने करोनावर मात केली आणि रुग्णालयातून सोडण्यात आले. रुग्णालयातून घरी जाण्यासाठी नर्सकडे कोणतेही साधन नव्हते. अशा कठीण परिस्थितीत लाइबीने मदत केली.

वाचा-
या घटनेची माहिती जेव्हा मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांना कळाली तेव्हा त्यांनी रिक्षा चालक लाइबीला १ लाख १० हजार रुपयांचे बक्षिस दिले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here