वाचा-
भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज एस बद्रीनाथचे आंतरराष्ट्रीय करिअर फार मोठे नव्हते. एक चांगला फलंदाज असून सुद्धा बद्रीनाथ टीम इंडियामध्ये जागा टीकवता आली नाही. बद्रीनाथने स्वत: ही गोष्टी सांगितली की, संघात जागा मिळवण्यासाठी मी सर्व काही प्रयत्न केले. पण , राहुल द्रवीड, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग सारख्या चांगल्या फलंदाजांमुळे मला संधी मिळाली नाही.
वाचा-
मी संघात स्थान मिळवण्यासाठी मी सर्व प्रयत्न केले. पण संघात फलंदाजीचा क्रम पूर्णपणे निश्चित होता. सचिन, राहुल, लक्ष्मण, सेहवाग, गंभीर आणि युवराज. मी गोलंदाजीकडे लक्ष दिले. टीममध्ये एक अष्ठपैलू म्हणून स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मी ऑफ स्पिन गोलंदाजी चांगली करत होतो, असे त्याने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.
बद्रीनाथने २००८ साली श्रीलंकेविरुद्ध वनडेत पदार्पण केले. त्यानंतर २०१० साली त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने एकमेव टी-२० सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २०११ साली खेळला.
वाचा-
माझ्या काळात जास्त मदत मिळत नसे. एक फलंदाजाच्या ऐवजी अष्ठपैलू म्हणून संघात जागा मिळाली असती तर मी ६ किंवा ७ व्या क्रमांकावर फलंदाजी केली असती आणि तिसरा फिरकीपटू म्हणून संघात भूमिका पार पाडली.
वाचा-
प्रथम श्रेणीत बद्रीनाथने १० हजारहून अधिक धावा केल्या. पण टीम इंडियाकडून तो फक्त १० सामने खेळू शकला. यात दोन कसोटी, ७ वनडे आणि एक टी-२० सामने खेळला. कसोटीत बद्रीने एक अर्धशतक केले. तर एकमेव टी-२० सामन्यात ४३ धावा केल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times