नवी दिल्ली: वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात मॅनचेस्टर येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवशी म्हणजे १९ जुलै १९५२ रोजी याच मैदानात एका संघाचे वस्त्रहरण झाले होते. एक संघ दिवसभरात दोन वेळा बाद झाला होता.

वाचा-
भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्थरावर वनडे आणि कसोटीत दर्जेदार कामगिरी केली आहे. पण ६८ वर्षांपूर्वी भारतीय संघावर एक मोठे संकट आले. हे संकट होते इंग्लंडचा या गोलंदाजाचे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. चार सामन्यांच्या मालिकेत भारत ०-२ने पिछाडीवर होता. तिसऱ्या कसोटी सामन्याला १७ जुलै रोजी सुरूवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ९ बाद ३४७ धावांवर पहिला डाव थांबवला.

वाचा-

त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला. भारताचा निम्मा संघ ९.५ षटकात फक्त १७ धावांवर बाद झाला आणि ५८ धावांवर संपूर्ण संघ माघारी परतला होता. इंग्लंडच्या फ्रेड ट्यूमॅनने ३१ धावा देत भारताच्या आठ विकेट घेतल्या. फ्रेड यांची ही पहिली कसोटी होती. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला पण दुसऱ्या डावात देखील भारताची फलंदाजी कोसळली. पहिल्या डावात ५८ धावा करणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त ८२ धावांवर बाद झाला.

वाचा-
भारताच्या दुसऱ्या डावात टॉनी लुक यांनी ३६ धावांत ४ विकेट घेतल्या. या सामन्यात १९९ जुलै १९५२ रोजी एका दिवसात २२ विकेट पडल्या आणि सर्वाधिक चर्चा झाली ती फ्रेड ट्यूमॅन यांनी घेतलेल्या ८ विकेटची. दुसऱ्या डावात फ्रेड यांना फक्त एकच विकेट मिळाली. त्यांनी भारतीय फलंदाजांच्या मध्ये दहशत निर्माण केली होती. या सामन्यात इंग्लंडने २०७ धावांनी विजय मिळवला.

वाचा-

वाचा-
संपूर्ण सामन्यात फ्रेड यांची गोलंदाजी होती १६.४ षटके, ७ षटके निर्धाव, ४० धावा आणि ९ विकेट. या विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यानंतर ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघ पुन्हा ९८ धावांवर बाद झाला. भारत सलग तिसऱ्या डावात १०० पेक्षा कमी धावसंख्येत बाद झाला होता. पण चौथा कसोटी सामनामुळे पूर्ण झाला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here