दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची () आज सोमवारी ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी बाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही बैठकीमध्ये आयसीसीने याबाबत निर्णय घेण्याचे टाळले होते. आता मात्र आयसीसीला याबाबत निर्णय घ्यावाच लागेल. आयसीसीच्या या निर्णयावर सर्वात जास्त लक्ष असेल ते बीसीसीआयचे कारण जर आयसीसीने ही स्पर्धा स्थगित केली तर IPLचा मार्ग मोकळा होईल.

वाचा-
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात करोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने मे महिन्यातच वर्ल्ड कप आयोजन करण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

वाचा-
भारतात देखील करोना रुग्णांची संख्या १० लाखाच्या पुढे गेली आहे. तर मृतांची संख्या २६ हजाराच्या पुढे आहे. अशात आयपीएलचे आयोजन करायचे असेल तर त्याला केंद्र सरकारची परवानगी लागेल. किंवा मग ही स्पर्धा बाहेरच्या देशात आयोजित करता येईल.

आयपीएलच्या आयोजनासाठी पहिले पाऊल होते की आशिया कप स्पर्धा स्थगित होण्याचे, आता आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्थगित झाल्यास आम्हाला या योजनेवर काम करता येईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा-
या वर्षी होणारी टी-२० स्पर्धा ऑस्ट्रेलियात २०२२ साली आयोजित करण्याची शक्यता आहे. कारण भारतात २०२१ साली वर्ल्ड कप होणार आहे. ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना वर्ल्ड कपच्या ऐवजी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेची तयारी करण्यास सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयने आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युएईमध्ये आयपीएलचे आयोजन होऊ शकते.

वाचा-
आयपीएलच्या आयोजनासाठी युएई आणि श्रीलंकेने उत्सुकता दाखवली होती. पण बीसीसीआयची पहिली पसंद युएई असल्याचे समजते. ही स्पर्धा आर्थिक कारणासाठी बीसीसीआयला गरजेची आहे. जर स्पर्धा झाली नाहीतर बीसीसीआयला कोट्यवधीचे नुकसान होऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here