Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: 27 Nov 2022, 9:24 pm

FIFA World Cup 2022 : या विश्वचषकात आज एक इतिहास लिहिला गेला आहे. आतापर्यंत या विश्वचषकात एकामागून एक धक्के बसत आहेत. आज रविवारी झालेल्या सामन्यातही असाच एक धक्का बसला आहे. आतापर्यंत Qatar World Cup 2022 मध्ये जी गोष्ट घडली नव्हती, ती आज कतारमध्ये पाहायला मिळाली. पाहा नेमकं घडलं तरी काय आहे…

 

FIFA World Cup 2022
सौजन्य-ट्विटर

हायलाइट्स:

  • आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये ही गोष्ट घडलीच नव्हती.
  • आज कतार विश्वचषकात ही गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे.
  • आज विश्वचषकात इतिहास लिहिला गेला.
दोहा : आतापर्यंत FIFA World Cup मध्ये जी गोष्ट घडली नव्हती, ती आज कतारमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे या विश्वचषकात आज एक इतिहास लिहिला गेला आहे.

आतापर्यंत या विश्वचषकात एकामागून एक धक्के बसत आहेत. आज रविवारी झालेल्या सामन्यातही असाच एक धक्का बसला आहे. आतापर्यंत FIFA World Cup च्या एकाही सामन्यात बेल्जियमच्या संघाला आफ्रिकन देशाकडून पराभव पत्करावा लागला नव्हता. बेल्जियम क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आफ्रिकेतील मोरक्को या देशाचा ते सहजपणे पाडाव करतील, असे सर्वांना वाटत होते. त्याचबरोबर आजचा त्यांना FIFA World Cup मधील ५०वा सामना होता. त्यामुळे आजच्या सामन्यात बेल्जियमचा संघ कोणती धमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण आजच्या सामन्यात मात्र त्यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. कारण कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या मोरक्कोच्या संघाने त्यांना २-० अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. पहिल्या सत्रात बेल्जियम आणि मोरक्को या दोन्ही देशांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत हा सामान गोलशून्य बरोबरीत होता. पण त्यानंतर सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला मोरक्कोकडून साबिरीने पहिला गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर बेल्जियमचा संघ चांगलाच आक्रमक झाला होता. त्यांनी यावेळी जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न केला खरा, पण यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. पण आक्रमण करत असताना त्यांचे बचावावर जास्त लक्ष नव्हते आणि याचाच फायदा मोरक्कोच्या संघाने उचलला. सामन्याच्या अतिरीक्त वेळेत अबोलखलालने गोल लगावला आणि मोरक्कोच्या संघाला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र बेल्जियमचा संघ निष्प्रभ झाल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

जर्मनीला पराभूत करणाऱ्या जपानला मोठा धक्का
जपानच्या संघाने यापूर्वी जर्मनीसारख्या संघाला पराभूत करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. पण या विश्वचषकातील दुसऱ्याच सामन्यात त्यांना धक्का बसला आहे. कारण दुसऱ्या सामन्यात कोस्टा रिकाच्या संघाने यावेळी जपानवर १-० असा विजय मिळवला. कोस्टा रिकाला यापूर्वी स्पेनकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता. पण या सामन्यात मात्र त्यांनी विजय मिळवला. पण या पराभवानंतर जपानला मोठा धक्का बसला आहे. कारण या सामन्यात जर त्यांनी विजय मिळवला असता तर जपानला बाद फेरीत पोहोचण्याची नामी संधी होती. पण या पराभवामुळे त्यांना ही संधी गमवावी लागली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here