नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेकदा मैदानावर चुकीच्या गोष्टी होतात. याला नेहमीच खेळाडू जबाबदार असतात असे नाही, तर काही वेळा अंपायर दोषी असतात. क्रिकेटमध्ये अनेकदा घडले आहे की अंपायरनी चुकीचे निर्णय दिले आणि सामन्याचा निकाल बदलला. अशाच एका चुकीच्या निर्णयाबद्दल एका अंपायरला १२ वर्षानंतर पश्चाताप झालाय. ही चुक भारतीय क्रिकेट संघाबाबत झाली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८ मध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर मालिका दोन कारणामुळे चर्चेत राहिली. पहिले कारण म्हणजे मंकीगेट प्रकरण होय आणि दुसरे म्हणजे अंपायर यांची खराब अंपायरिंग होय. बकनर यांनी १२८ कसोटी आणि १८१ वनडेत अंपायरिंग केली. बकनर त्यांच्या करिअरमध्ये कोणत्याही वादात पडले नाहीत. पण करिअरच्या अखेरच्या काळात त्यांनी काही चुका केल्या. यात २००८ मधील सिडनी येथे झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याचा समावेश होता.

वाचा-
सिडनी कोसटीत झालेल्या चुकीबद्दल बोलताना बकनर म्हणाले, मी सिडनीत झालेल्या २००८ मधील कसोटी सामन्यात दोन चुका केल्या. पहिली चुक तेव्हा झाली जेव्हा भारत चांगली कामगिरी करत होता आणि मी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला शतक करू दिले. दुसरी चुक सामन्याच्या पाचव्या दिवशी केली ज्यामुळे कदाचित भारताला सामना गमवावा लागला. पाच दिवसातील त्या दोन चुका करणारा मी पहिला अंपायर होतो? पण तरी देखील त्या दोन चुकांबद्दल मला आजही त्रास होतो.

सिडनी कसोटीत इशांत शर्माच्या चेंडूवर विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने अॅड्यू सायमंड्सचा कॅच घेतला होता. पण बकनर यांनी त्याला नॉट आउट दिले. सायमंड्स तेव्हा ३० धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने १६२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया ६ बाद १३४ वरून ४६३ पर्यंत मजल मारू शकला.

वाचा-
बकनर यांची दुसरी चुक म्हणजे भारत ३३३ धावांचा पाठलाग करत असताना त्यांनी राहुल द्रविडला बाद नसताना बाद दिले. द्रविडची बॅट पॅडच्या मागे होती आणि रिप्लेमध्ये बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नव्हता.

या घटनेनंतर आयसीसीने तिसऱ्या कसोटीतून बकनर यांना अंपायर म्हणून बाजूला केले. कारण दोन्ही संघात तणाव वाढला होता. इतक नव्हे तर भारतीय संघाने मालिकेतून माघार घेण्याचे ठरवले होते.

वाचा-

या चुकांवर बोलताना बकनर म्हणाले, तुम्हाला हे समजून घेता आले पाहिजे की, चुका का होतात. तुम्ही एकाच प्रकारची चूक पुन्हा करू इच्छीत नाही. मी कोणतेही कारण देत नाही. पण तेव्हा हवा वेगाने वाहत होती. त्यामुळे कोणताही आवाज ऐकू येत नाही. समालोचकांना विकेटमधील माइकमुळे आवाज ऐकू येतो. ही अशी गोष्ट असते जी प्रेक्षकांना माहित नसते.

वाचा-
स्टीव्ह बकनर यांनी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील दोन वेळा वादग्रस्तरित्या बाद दिले होते. बकनर यांनी २००९ साली निवृत्ती घेतली. पण काही निर्णयांमुळे त्यांचे नाव वादासोबत सोडले गेले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here