नवी दिल्लीः शाओमीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनला दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. याची बेस व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत ११ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये ५ कॅमेरे ( चार रियर आणि एक फ्रंट ), दमदार मीडियाटेक हीलिय प्रोसेसर आणि 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीने एका ऑनलाइन कार्यक्रमात फोनला लाँच केले आहे.

वाचाः

रेडमी नोट ९चे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर दिला आहे. या फोनची 2340×1080 पिक्सल आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डॉट डिस्प्ले दिला आहे. फोनला स्प्लॅश फ्री नॅनो कोटिंग आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा मेन एवन कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. जबरदस्त फोटोग्राफीचा अनुभव मिळावा यासाठी यात खास मोड फीचर देण्यात आले आहेत.

वाचाः

रेडमी नोट ९ च्या फ्रंट कॅमेऱ्यात १३ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा मिळणार आहे. फ्रंटला कॅमेरा HDR, फ्रंट फेसिंग फ्लॅश, फेस रिकॉग्निशन आणि अनेक AI मोड्स देण्यात आले आहे. १९९ ग्रॅमचे वजन असलेल्या या फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी 18 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला २२.५ वॉटचे चार्जर मिळते. फोनचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनचा सेल २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here