Vivo V25 5G

Vivo V25 5G : Vivo V25 मध्ये ६.४४ – इंचाचा FHD + डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या फोनमध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ४५०० mAh बॅटरी आहे, ज्यासोबत ४४ W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. Vivo V25 5G मध्ये भन्नाट कॅमेरा आहे. ज्यामध्ये 64 MP+8 MP+2 MP चे रिअल कॅमेरे दिले देण्यात आले आहेत. या फोनची किंमत २७,९९९ रुपयांपासून सुरू होते. जर तुमचे बजेट २८ हजारांपर्यंत असेल तर, तुम्ही Vivo V25 5G चा नक्कीच विचार करू शकता.
iQOO Neo 6 5G

iQOO Neo 6 5G : या स्मार्टफोनमध्ये ६.६२ -इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच iQOO Neo 6 5G मध्ये ४७०० mAh बॅटरी देखील तुम्हाला मिळेल. यासोबत ८० W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. iQOO Neo 6 5G फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसर आणि 64 MP+8 MP+2 MP तीन रियर कॅमेरे देखील देण्यात आले आहेत. या जबरदस्त फोनची किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरू होते . iQOO चे फोन आवडत असतील तर या फोनचा नक्कीच विचार करा.
वाचा : जीओ ठप्प झाल्यामुळे युजर्स नाराज ! जाणून घ्या यापूर्वी युजर्सना कधी-कधी झालाय Jio Down चा त्रास
Realme GT Neo 3T

Realme GT Neo 3T : स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसर, ६.६२ -इंच AMOLED डिस्प्लेसह येणारा हा फोन तुम्ही चांगल्या गेमिंग एक्स्पीरियंससाठी खरेदी करू शकता. Realme GT Neo 3T फोन ५००० mAh बॅटरी जलद चार्जिंगसाठी ८० W सुपर डर्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो Realme GT Neo 3T मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 64 MP+8 MP+2 MP लेन्स उपलब्ध आहेत. तसेच, १६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. Realme GT Neo 3T ची सुरुवातीची किंमत २९,९९९ रुपये आहे.
वाचा: एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायचे असल्यास फोन नंबर, IMEI किंवा IP Address ची किती मदत होते?
Poco F4 5G

Poco F4 5G : गेमिंगची आवड असेल आणि फास्ट डिव्हाइस खरेदी करण्याचा जर तुमचा विचार असेल तर, तुम्ही Poco F4 5G चा देखील विचार करू शकता. हा देखील गेमिंगसाठी एक शक्तिशाली फोन आहे. POCO F4 5G मध्ये ६७ W जलद चार्जिंग फीचर्ससह ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर सुद्धा या फोनमध्ये आहे. तसेच, ६.६७ -इंचाचा FHD + E4 AMOLED डिस्प्ले आणि 64 MP मेगापिक्सेल AI ट्रिपल रिअर कॅमेरा ही त्याची इतर वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत २७,९९९ रुपयांपासून सुरू होते.
Redmi K50i 5G

Redmi K 50i 5G : Redmi K50i टर्बो चार्जिंगसह ५०८० mAh बॅटरीसह येतो. नवीन Redmi फोन खरेदी करायचा असल्यास आणि चांगले गेमिंग डिव्हाइस खरेदी करायचा प्लान असल्यास तुम्ही Redmi K50i 5G चा नक्कीच विचार करू शकता. Redmi K50i 5G मध्ये यात ६.६- इंचाचा Liquid FFS डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये भन्नाट कॅमेरा सेटअप आहे. यात 64 MP+8 MP+2 MP चे तीन Rear कॅमेरे उपलब्ध आहेत. फोनची किंमत २३,९९९ रुपयांपासून सुरू होते.
वाचा: 108MP कॅमेरासह पॅक्ड Samsung चा 5G फोन १९४९९ रुपयांमध्ये होईल तुमचा, फोनची MRP ४७४९० रुपये
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times