Smartphone Offers: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नवीन Amazon Fab Phones Fest सेल सुरू झाला आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफरचा लाभ घेता येईल. या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही हँडसेट स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon सेलमध्ये, Xiaomi, Samsung पासून OnePlus पर्यंतच्या फोनवर सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Amazon वर Fab Phones Fest सेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला SBI कार्डवर १० % सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्हाला नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळू शकतो. अॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना बँक ऑफ बडोदा आणि अमेरिकन एक्सप्रेस कार्डवरही सूट मिळेल. यामध्ये तुम्हाला स्वस्त बजेट फोन आणि मिड रेंज फोन आकर्षक ऑफर्सवर मिळतील. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरचे तपशील आणि फोनचे फीचर्स सविस्तर जाणून घेऊया.

Realme Narzo 50

realme-narzo-50

Realme Narzo 50 Pro: सवलतीनंतर तुम्ही Realme Narzo 50 Pro २०,९९९ मध्ये खरेदी करू शकता. Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक डायमेंशन ९२० ५जी चिपसेटचा सपोर्ट यात मिळतो. Redmi K50i हा देखील मध्यम श्रेणीतील एक चांगला पर्याय आहे. हा फोन तुम्ही Amazon वरून २२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. ही किंमत डिस्काउंट नंतरची आहे.

वाचा: अनेक तास बंद राहिल्यानंतर Jio ची सेवा पुन्हा सुरू, नाराज युजर्स म्हणाले 5G ची अशी तयारी?

Xiaomi 11 Lite NE 5G

xiaomi-11-lite-ne-5g

Xiaomi 11 Lite NE 5G: ज्यांना स्लिम आणि स्टायलिश फोन हवा आहे त्यांच्यासाठी Xiaomi 11 Lite NE 5G हा एक चांगला पर्याय आहे. सेलमध्ये Xiaomi 11 Lite NE 5G केवळ १९,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच १०-बिट एमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले फुल एचडी+ रिझॉल्यूशन, Dolby Vision आणि HDR10+ सपोर्टसह येतो. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ दिला आहे. तुम्ही OnePlus Nord CE 2 Lite 5G या सेलमधून तुम्ही १८९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

वाचा: बापरे ! Bluetooth च्या मदतीने सुद्धा हॅकर्स तुमचे डिटेल्स मिळवू शकतात, असे रहा अलर्ट

​Samsung Galaxy M33

samsung-galaxy-m33

Samsung Galaxy M33: जर तुम्हाला मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही यासाठी Samsung Galaxy M33 वापरून पाहू शकता. डिस्काउंटनंतर हा फोन 16,999 रुपयांना मिळेल. Samsung Galaxy M33 5G 120Hz रिफ्रेश रेटसह ६.६ -इंचाचा FHD+ डिस्प्ले असून हा डिस्प्ले अतिशय स्मूथ आहे. जो तुमचे फोटो, व्हिडिओ आणि गेम खेळण्याचा अनुभव वाढवण्यास मदत करतो. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण उपलब्ध आहे.. Device 16GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देते. पॉवरसाठी, यात ६००० mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा: Gaming चा अनुभव दुप्पट करतील हे स्मार्टफोन्स, फास्ट चार्जिंगसोबतच इतरही अनेक मस्त फीचर्स, पाहा लिस्ट

Redmi A1

redmi-a1

Redmi A1 : तुम्ही ७६४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर Redmi 10A खरेदी करण्यास सक्षम असाल. या व्यतिरिक्त, तुम्ही या सेलमधून Realme Narzo 50 A स्वस्तात देखील खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर हा फोन तुम्हाला ९४९९ रुपयांच्या किंमतीत मिळेल.Realme Narzo 50 A मध्ये देण्यात आलेले फीचर्स एकापेक्षा एक आहेत. जर तुम्हाला एंट्री लेव्हल हँडसेट हवा असेल तर, तुमच्याकडे Redmi A1 चा पर्याय सुद्धा आहे. हा फोन तुम्हाला Amazon वर ५८४९ रुपयांना डिस्काउंटनंतर मिळेल.

Samsung Galaxy M13

samsung-galaxy-m13

Samsung Galaxy M13: तुम्हाला सॅमसंगचे फोन्स आवडत असतील तर, तुम्ही Samsung Galaxy M13 ९४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Samsung Galaxy M13 सॅमसंगचा हा एक स्वस्त फोन आहे. जर तुम्हाला कमी बजेटचा हँडसेट हवा असेल तर, तुम्हाला या सेलमध्ये अनेक पर्याय मिळतील. सेलमधून iQOO Z6 Lite 5G १३,९९९ रुपये किमतीत खरेदी करू शकता. हा फोन ५० MP कॅमेरासह येतो. तसेच, iQOO Z6 Lite 5G मध्ये 5G सपोर्ट आणि मजबूत बॅटरीसह देखील युजर्सना मिळेल.

वाचा: जीओ ठप्प झाल्यामुळे युजर्स नाराज ! जाणून घ्या यापूर्वी युजर्सना कधी-कधी झालाय Jio Down चा त्रास

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here