सॅमसंगने गॅलेक्सी बुक फ्लेक्स अल्फा या टु-इन-वन या प्रकारातील लॅपटॉपचे अनावरण केले असून लवकरच हे मॉडेल बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहे.

लास व्हेगास शहरात भरणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो अर्थात सीईएसच्या आधी अनेक कंपन्या आपले आगामी विविध प्रॉडक्ट सादर करत असतात. या अनुषंगाने सॅमसंगने गॅलेक्सी बुक फ्लेक्स अल्फा या मॉडेलचे अनावरण केले आहे. हा लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापरता येणार आहे. अर्थात, हे मॉडेल टु-इन-वन या प्रकारातील आहे. यात १३.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा व क्युएलईडी या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात इंटेलचा दहाव्या पिढीतील कोअर आईस लेक प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी बुक फ्लेक्स या मॉडेलसोबत स्वतंत्र स्टायलस पेनदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही डिस्प्लेवर रेखाटू शकणार आहे. यात फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी दर्जेदार बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे साडे सतरा तासांचा बॅकअप देऊ शकेल असा कंपनीचा दावा आहे. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. तसेच यात व्हिडीओ कॉलींगसाठी एचडी कॅमेरादेखील दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here