नवी दिल्लीः जर तुम्हाला वाटत असेल की, फोनमध्ये कोणत्याही नंबर वापरासाठी सीम कार्ड आवश्यक आहे. तर तुमचा हा अंदाज खोटा आहे. जगभरात अनेक कंपन्यांनी आपल्या युजर्संसाठी आणली आहे. या सर्विसच्या मदतीने विना फिजिकल सीम कार्ड लावता फोन नंबरचा वापर केला जावा शकतो. व्होडाफोन आयडियाने भारतात पोस्टपेज युजर्संसाठी ही सर्विस आणली आहे. काही फोनमध्ये च्या मदतीने व्होडाफोन आयडियाच्या नंबरचा वापर केला जावू शकतो.

वाचाः

कंपनीकडून eSIM सर्विसची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्या फोनमध्ये ही सर्विस देण्यात येणार आहे.याची माहिती सुद्धा कंपनीने दिली आहे. अॅपलच्या फोनमध्ये ही सर्विस देण्यात येणार आहे. अॅपलच्या iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone SE, iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR या आयफोनमध्ये ही सर्विस काम करेल. तसेच Samsung Galaxy Z Flip आणि Galaxy Fold या फोनमध्ये सुद्धा ही सर्विस काम करणार असल्याचे व्होडाफोन आयडिया कंपनीने सांगितले आहे.

वाचाः

नवीन ई सीम सर्विस सर्व सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात आली नाही. सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरात मधील पोस्टपेड युजर्ससाठी ही सुविधा देण्यात आली आहे. हार्ड अँड डिव्हाईसेज मध्ये ई सीम सर्विस देण्यात आली आहे. एक इंटिग्रेटेड सिम चीप म्हणून काम करणार आहे. यासाठी वेगळे सीमकार्ड घेण्याची गरज नाही. त्यामुळे फोनमध्ये विना सीमकार्ड युजर्स व्होडाफोन आयडियाच्या नंबरवरून कॉल, एसएमएस आणि मोबाइल डेटाचा अॅक्सेस मिळेल.

वाचाः

अशी मिळणार eSIM सर्विस

>> युजर्संना आपल्या नंबरवरून ईमेल आयडी लिंक करण्यासाठी ‘eSIM email id’ लिहून १९९ वर एसएमएस करावा लागेल.
>> त्यानंतर ईमेल आयडी नोंदणी होईल. eSIM सर्विस घेण्यासाठी ESIMY लिहून कन्फर्मेशन एसएमएस १९९ वर रिप्लाय पाठवावा लागेल.
>> त्यानंतर कन्फर्मेशन एसएमएस आल्यानंतर तुम्हाला कॉलवर ई सीम साठी कन्सेन्ट द्यावा लागेल.
>> तसेच रजिस्टर्ड ईमेल आयडी वर एक क्यूआर कोड पाठवावा लागेल.
>> आता आपल्या डिव्हाईस सेटिंग्सच्या मोबाइल डेटा आणि अॅड डेटा प्लान मध्ये जावून कोड स्कॅन करण्याचा ऑप्शन मिळेल.
>> ईमेलवर आलेला कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागेल.
>> या दरम्यान वाय फाय किंवा मोबाइल डेटाने कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमचे ई सीम सेटअप होईल.

जर तुम्हाला ही सेवा हवी असेल तर तुम्ही व्होडाफोन स्टोरवर जावून आपल्या स्मार्टफोनसाठी मागू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here