जर तुम्हाला दररोज जास्त डेटा खर्च करण्याची सवय असेल तर आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या डेली ३ जीबी डेटाच्या प्लानविषयी खास माहिती देत आहोत. दररोज 3GB डेटा देणारा सर्वात स्वस्त प्लान कोणता आहे. देशात गेल्या काही महिन्यापासून करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे अनेक जण सरकारी व खासगी कंपनीतील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत होते. देशात लॉकडाऊन अनेक ठिकाणी शिथील करण्यात आले आहे. काही ठिकाणी अद्यापही कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक जणांना जास्तीचा डेटा खर्च करावा लागत आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा शिवाय, फ्री कॉलिंग सुद्धा मिळते. तसेच तुम्हाला एसएमएस पाठवण्याची सुविधा सुद्धा दिली जाते. तसेच या प्लानमध्ये अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. तर मग जाणून घ्या तुमच्यासाठी कोणत्या कंपनीचा कोणता प्लान बेस्ट आहे…

जर दररोज ३ जीबी डेटा देणाऱ्या प्लानवर एक नजर टाकली तर रिलायन्स जिओकडे असे ३ प्लान आहेत. तर एअरटेल आणि व्होडाफोन कडे रोज ३ जीबी डेटा देणारे २-२ रिचार्ज प्लान आहेत. दररोज खर्च होणाऱ्या हिशोबानुसार, पाहिले तर 3GB डेटा देणाऱ्या एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लान सर्वात स्वस्त प्लान आहेत. तसेच, एअरटेल आणि व्होडाफोनच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तर जिओच्या या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर कॉलिंग फ्री मिळते. परंतु, दुसऱ्या नेटवर्कच्या नंबरवर कॉल करण्यासाठी नॉन जिओ मिनिट मिळतात.

एअरटेलकडे दररोज ३ जीबी डेटा देणारे २ प्लान आहे. पहिला रिचार्ज प्लान ५५८ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. त्यामुळे या प्लानवर दिवसाचा खर्च ९.९६ रुपये आहे. प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. तसेच रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा युजर्संना मिळते. प्लानमध्ये युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच Airtel Xstream प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

डेली ३जीबी डेटा देणारा एअरटेलचा दुसरा प्लान ३९८ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये रोजचा खर्च १४.२१ रुपये आहे. प्लानमध्ये युजर्संना रोज 100 SMS पाठवता येवू शकते. कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सुविधा आहे. तसेच Airtel Xstream प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

व्होडाफोनकडे डेली ३ जीबी डेटा देणारे २ प्लान आहेत. पहिला प्लान ५५८ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज ९.९६ रुपये खर्च करावे लागतील. प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस मिळते. प्लानमध्ये युजर्संना ४४९ रुपयांच्या किंमतीचा व्होडाफोन प्ले आणि ९९९ रुपयांचा झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

रोज ३ जीबी डेटा देणारा व्होडाफोनचा दुसरा प्लान ३९८ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानसाठी रोज १४.२१ रुपयांचा खर्च करावा लागतो. प्लानमध्ये एकूण ८४ दिवसांचा आहे. तसेच व्होडाफोनच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. प्लानमध्ये युजर्सला ४४९ रुपयांच्या किंमतीचे व्होडाफोन प्ले आणि ९९९ रुपयांचे झी ५ चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

रिलायन्स जिओकडे दररोज ३ जीबी डेटाचे ३ प्लान आहेत. पहिला प्लान ९९९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. प्लानमध्ये दररोज खर्च ११.८९ रुपये आहे. या रिचार्ज प्लानमध्ये एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री मिळते. तर अन्य नेटवर्कवर नंबर कॉलिंग साठी एकूण ३ हजार नॉन जिओ मिनिट मिळते. तसेच रोज १०० एसएमएस पाठवण्याची सविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा दुसरा प्लान ४०१ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये दररोजचा खर्च १४.३२ रुपये आहे. जिओ ते जिओ कॉलिंग फ्री आहे. तर अन्य दुसऱ्या नेटवर्कवर नंबर कॉल करण्यासाठी १ हजार जिओ मिनिट मिळतो. दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओच्या या प्लानमध्ये ३९९ रुपये किंमतीचे Disney+ Hotstar चे एका वर्षापर्यंत सब्सक्रिप्शन मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा ३ जीबी डेटा देणारा ३४९ रुपयांचा हा तिसरा प्लान आहे. या प्लानमची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोजचा खर्च १२.४६ रुपये आहे. प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ ते जिओ एकदम फ्री कॉलिंग आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. प्लानमध्ये १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा यात मिळते. तसेच जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here