Youtube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहिर केली आहे. या यादीवरून तुम्हाला कळेल की, 2022 या वर्षांत लोकांनी युट्यूबवर काय पाहणं अधिक पसंत केलं. या वर्षात भारतात लोकांनी सर्वात जास्त काय पाहिलं. गुगल कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या वर्षात भारतात सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडीओंची यादी शेअर केली आहे. गुगल ट्रेंडनुसार, दर्शवितो की लोकांनी थेट ई-स्पोर्ट्स 60 सेकंदांपासून ते 4-तासांच्या लहान व्हिडिओंपर्यंत पाहिले.

गुगलने यावेळी टॉप 10 ट्रेंडिंग व्हिडीओ, टॉप 10 म्युझिक व्हिडीओ आणि टॉप 10 शॉर्ट्स अशा विविध कॅटेगरीमधील भारतातील लोकप्रिय व्हिडीओंची यादी जारी केली आहे. याशिवाय, YouTube ने 2022 चा ब्रेकआउट क्रिएटर, ब्रेकआउट वुमन क्रिएटर आणि ओव्हरऑल टॉप रँक क्रिएटर ऑफ द इयरची यादी देखील शेअर केली आहे.

यूट्यूब इंडियाच्या टॉप ट्रेंडिंग कंटेंट कॅटेगरीमध्ये यावर्षी एज ऑफ वॉटर (Age of Water) हा व्हिडीओ पहिल्या क्रमांकावर आहे. Round 2 Hell’s या यूट्यूब चॅनलचा (YouTube Channel) हा व्हिडीओ असून या चॅनलचे 28 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या यादीतील दुसरा व्हिडीओ सस्ता शार्क टँक (Sasta Shark Tank) आहे. हा यूट्यूबर (YouTuber) आशिष चंचलानीचा (Ashish Chanchlani) व्हिडीओ आहे.

म्युझिक आणि गाण्याच्या कॅटेगरीमध्ये पुष्पा आणि कच्चा बादामची जादू पाहायला मिळाली आहे. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं यूट्यूबच्या टॉप 10 लोकप्रिय गाण्यांमध्ये अव्वल आहे. 

News Reels

technology

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here