BSNL Plan

BSNL चा २६९ रुपयांचा प्लान: जर तुम्ही BSNL युजर्स असाल तर, तुम्ही २६९ रुपयांच्या प्लानसह रिचार्ज करू शकता. २६९ रुपयांच्या प्लानमध्ये 2GB हाय-स्पीड डेली डेटा उपलब्ध आहे. व्हॅलिडिटीबद्दल सांगायचे झाल्यास bsnl च्या या प्लानची वैधता ३० दिवस आहे. यासोबतच, मोफत EROS Now मनोरंजन सेवेची सदस्यता देखील दररोज १०० एसएमएस या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळतील. तसेच, तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग देणारा स्वस्त प्लान शोधत असाल तर, हा प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यात अमर्यादित कॉलिंग सुद्धा उपलब्ध आहे.
VI Plan

Vi चा २९९ रुपयांचा प्लान: बेनेफिट्सच्या बाबतीत VI देखील मागे नाही. कंपनीकडे Jio आणि Airtel ला टक्कर देणारे एकापेक्षा एक जोरदार प्लान्स उपलब्ध आहेत. म्हणूनच अनेक युजर्स VI ची सेवा वापरतात. Vi चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ३०० रुपयांपेक्षा कमी चांगला पर्याय आहे. व्हॅलिडिटीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये, २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच, डेटा युजर्ससाठी देखील हा प्लान चांगला आहे. यात रोज १.५ GB डेटा उपलब्ध आहे. दररोज १०० SMS सोबत, हा प्लॅन सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग फायदे देखील देतो.
वाचा:Jio चा सुपरहिट प्लान, फक्त २०० रुपये एक्स्ट्रा खर्च केल्यास मिळणार १४ OTT ची मजा
Jio Plan

जिओचा २९९ रुपयांचा प्लान: रिलायन्स जिओचा २९९ रुपयांचा प्लान डेटा युजर्ससाठी देखील चांगला पर्याय आहे. रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो. तसेच, कॉलिंग करणाऱ्यांसाठी देखील हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. दररोज 100SMS चा पर्यायही मिळतो. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देखील उपलब्ध आहे. तुम्ही जर जिओ युजर असाल आणि कमी किमतीत अधिक फायदे देणारा प्लान शोधात असाल तर या प्लानचा नक्कीच विचार करू शकता.
Airtel Plan

एअरटेलचा २९९ रुपयांचा प्लान: एअरटेल कंपनी ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार अनेक प्लान्स ऑफर करते. कंपनीकडे अगदी कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत अनेक भन्नाट प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही एअरटेल युजर असाल, स्वस्तात मस्त प्लानच्या शोधात असाल तर, Airtel चा २९९ रुपयांचा प्लान तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. एअरटेलच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज १०० SMS देखील मिळतात . तसेच, या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्यायही उपलब्ध आहे.
वाचा : किलर फीचर्ससह पॅक्ड iPhone 14 आयफोन 13 पेक्षा कमीमध्ये पोहोचेल घरी, ‘ही’ डील पाहाच
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times