64 MP Camera Smartphones Under 15000: स्मार्टफोन खरेदी करताना परफेक्ट फोनची निवड करणे दिसते तितके सोपे नाही. अनेक गोष्टींची काळजी फोन खरेदी करताना घ्यावी लागते. पण, आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना बहुतेकजण ज्या फिचरची सर्वात जास्त काळजी घेतात त्यात Camera डिस्प्ले, बॅटरी आणि स्टोरेज यांचा समावेश होतो. आजकाल बाजारात लाँच होणारे बहुतेक स्मार्टफोन्स उत्तम कॅमेरा फीचर्ससह येतात. जर तुम्हाला १५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगला कॅमेरा आणि फीचर्स असलेला फोन हवा असेल, तर Redmi, Samsung आणि Tecno सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन तुमच्यासाठी काही चांगले पर्याय ऑफर करतात. स्मार्टफोन कंपन्या Redmi Note 10S, Samsung Galaxy M32 आणि Tecno Camon 19 मध्ये १५००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ६४ MP कॅमेरा सेन्सर ऑफर करतात. जाणून घेऊया इतर फीचर्सबद्दल आणि फोन्सच्या किमतींबद्दल सविस्तर.

Poco M4 Pro

poco-m4-pro

Poco M4 Pro: या Poco स्मार्टफोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.६ -इंचाचा फुल-एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे, जो १०८० x २४०० पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. फोन 1000 nits पीक ब्राइटनेस आणि १८० Hz टच सॅम्पलिंग रेट आणि ४०९ पिक्सेल प्रति इंच पिक्सेल घनतेसह येतो. फोनच्या मागील पॅनलमध्ये ६४-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, ८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये ३३ W फास्ट चार्ज सपोर्टसह ५००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. फोनची किंमत अमॅझॉनवर १४१९९ रुपये आहे .

वाचा: ATM मधून पैसे काढताना तुम्हीही या चुका करता ? राहा अलर्ट, हॅकर्सची तुमच्यावर नजर

Samsung Galaxy M32

samsung-galaxy-m32

Samsung Galaxy M32: Samsung Galaxy M32 स्मार्टफोनमध्ये ६.४ -इंचाचा सुपर AMOLED इन्फिनिटी यू-कट डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन फुलएचडी+ आहे. Samsung Galaxy M32 मध्ये 64-megapixel चा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. याशिवाय ८ मेगापिक्सल, २ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल सेन्सर्सही आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये २०-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.Galaxy M32 स्मार्टफोन ६०००mAh बॅटरीसह येतो. या हँडसेटमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येते. फोनची किंमत १३,४९९ रुपये आहे.

वाचा : Airtel- Jio- Vi- BSNL युजर्स द्या लक्ष, अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह येणाऱ्या या प्लान्सची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी

Tecno Camon 19

tecno-camon-19

Tecno Camon 19: Techno Camon 19 स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. याशिवाय, बॅक पॅनलवर २-मेगापिक्सलचा सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल सांगायचे तर, Tecno Camon 19 ला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन MediaTek Helio G85 प्रोसेसर सह येतो.Tecno Camon 19 खरेदी करण्यासाठी तुम्हाला १४,९८३ रुपये खर्च करावे लागतील. Tecno कंपनीचे फोन्स आवडत असतील तर तुम्ही Tecno Camon 19: हा नक्कीच विचार करू शकता

Redmi Note 10S

redmi-note-10s

Redmi Note 10S: Redmi च्या या हँडसेटमध्ये 64MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, २ मेगापिक्सेल मॅक्रो आणि २ मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ -मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये फुलएचडी+ एमोलेड डॉट डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये 12nm प्रक्रियेवर आधारित MediaTek Helio G95 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. फोनची किंमत १४९९९ रुपये आहे.

वाचा :Jio चा सुपरहिट प्लान, फक्त २०० रुपये एक्स्ट्रा खर्च केल्यास मिळणार १४ OTT ची मजा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here