वाचाः
किंमत किती?
वनप्लस नॉर्ड कंपनीचा सर्वात स्वस्त फोन आहे. आतापर्यंत या फोनची किंमत समोर आली नाही. परंतु, या फोनची किंमत ५०० डॉलर म्हणजेच ३७ हजार रुपये किंमत असू शकते.
वनप्लस नॉर्डचे कन्फर्म फीचर्स
वनप्लस नॉर्ड देशात लाँच होणारा सर्वात स्वस्त ५जी फोन असणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G 5G प्रोसेसर देण्यात येणार आहे. कंपनीने वनप्लस नॉर्ड मध्ये अमोलेड डिस्प्ले आणि समोर एक पिल शेप कटआऊट असल्याची माहिती आहे. वनप्लस मध्ये पहिल्यांदा ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्यासोबत अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाणार आहे.
फोनचा कॅमेरा बेस्ट
OnePlus Nord च्या कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळणार आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि चौथा मायक्रो सेन्सर बॅक पॅनेलला दिला जाणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि दुसरा सेकंडरी सेन्सर दिला जाणार आहे. तसेच रियरवर क्वॉड आणि फ्रंट पॅनेलवर ड्यूल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनवर शेयर केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये ल्यू यांनी म्हटले की, नॉर्डच्या दोन्ही फ्रंट फेसिंग कॅमेरा एल्गोरिद्म सोबत येतील.
वाचाः
एआय आणि लाँग एक्सपोजर टेक्नोलॉजीच्या मदतीने सेल्फी ब्राईट अप करते. लो लाइट मध्ये नॉइस सुद्धा कमी करतो. या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात मिळणाऱ्या एआय फेस डिटेक्शनफीचर सपोर्ट प्रत्येक सेल्फीला शार्प आणि क्लियर बनवले. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आणि १२ जीबीपर्यंत रॅम दिला जाणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4115mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसाठी 30W वार्प चार्ज सपोर्ट दिला जाणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times