नवी दिल्लीः ग्राहकांना रियलमी नार्जो १० स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आज पुन्हा एकदा मिळणार आहे. आज दुपारी १२ वाजता या स्मार्टफोनचा सेल फ्लिपकार्ट आणि कंपनीचे वेबसाईटवर होणार आहे. मे महिन्यात लाँच झालेला स्मार्टफोन तीन कलरमध्ये मिळणार आहे. हा फोन 4GB रॅम + 128GB स्टोरेजमध्ये येतो. अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसर मिळतो. तसेच या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा दिला आहे.

वाचाः

किंमत आणि ऑफर्स
भारतात रियलमी नार्जो १० ची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ही किंमत फोनच्या ४ जीबी रॅम मॉडलची आहे. MobiKwik यूजर्स ला या फोन खरेदीवर ५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केली जात आहे. फ्लिपकार्टवर Axis Bank Buzz क्रेडिट कार्डधारकांना ५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

वाचाः

चे वैशिष्ट्ये
रियलमी नार्जो १० मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसर दिला आहे. हा फोन एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. या फोनची इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. यात कनेक्टिविटीसाठी 4जी वीओएलटीई, 3जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी यासारखे कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी रियलमी नार्जो १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आण व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here