Smartwatch: गेल्या काही काळात स्मार्टवॉचेसची खरेदी आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. डिव्हाइसेसमध्ये मिळत असलेले फीचर्स युजर्सना विशेष आकर्षित करतात. इतकेच नाही. तर, काही स्मार्टवॉचद्वारे तुम्ही घड्याळातूनच डायरेक्ट कॉल्स आणि मेसेजना उत्तर देऊ शकता. अलर्ट्स व्यतिरिक्त, स्मार्टवॉच हे अथलीट्स आणि क्रीडाप्रेमींसाठी सर्वोत्तम उपकरण आहेत. सेन्सरमुळे स्मार्टवॉच सर्वाधिक उपयुक्त आहेत. सहसा घड्याळांमध्ये ECG, SpO2 आणि VO2 max चा समावेश असतो. महत्वाचे म्हणजे आजकालच्या आरोग्यासाठीही या सेन्सर्सचा वापर केला जात आहे. यापैकी काही मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला चांगली झोप घ्यायची असल्यास, तुमच्या झोपेचा मागोवा घेण्यासाठी कनेक्ट केलेले घड्याळ हे उपयुक्त उपकरण आहे. अशात नवीन स्मार्टवॉच खरेदी करताना या ३ पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता. तसेच, वॉच खरेदी करतांना काही गोष्टींकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. पाहा डिटेल्स.

Android-ios

android-ios

तुमच्यासाठी सर्वोत्तम घड्याळ कसे निवडायचे? सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या अनुषंगाने Android आणि iOS यापैकी एक निवडू शकता. आयफोन असलेला कोणताही युजर्स ऍपल वॉच सर्वोत्तम पर्याय म्हणून वापरू शकतो. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर, सर्वोत्तम निवडणे थोडे कठीण होते. अशा परिस्थितीत, तुम्हाला बरेच पर्याय मिळू शकतात. जर तुम्ही टच स्क्रीन, कीबोर्ड स्क्रीन, AMOLED डिस्प्लेला प्राधान्य देत असाल तर तुम्ही ते कसे वापरणार आहात हे पाहणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य डिव्हाइस निवडू शकता.

वाचा: 64 MP कॅमेरा आणि AMOLED डिस्प्लेसह पॅक्ड ‘या’ पॉवरफुल फोनच्या किमतीत कपात

Smartwatch Design

smartwatch-design

स्मार्ट घड्याळ खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा: स्मार्टवॉचकडे आजकाल युजर्स स्टाईलचा भाग म्हणून देखील पाहतात. त्यामुळे स्मार्टवॉच खरेदी करताना डिझाइन देखील एक महत्त्वाचा घटक असेल. घड्याळाचा स्ट्रॅप देखील खूप महत्वाचा आहे. त्याचा आकार आणि कन्टेन्ट देखील विचारात घेणे आवश्यक आहे. काही वॉचेसमध्ये स्टॅंडर्ड स्ट्रॅप तर असतो. तर, काही वेगवेगळ्या आकारांनी सुसज्ज असतात. तुम्‍ही तुमच्‍या स्‍मार्टफोनपासून नेहमी १० मीटरपेक्षा कमी अंतरावर असले पाहिजे. कारण, बहुतांश स्‍मार्टवॉच ब्लूटूथ कनेक्‍शनद्वारे काम करतात.

वाचा :Top Smartphones: या वर्षी लाँच झालेल्या ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन्सने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला

Samsung Galaxy Watch 5 Pro

samsung-galaxy-watch-5-pro

Samsung Galaxy Watch 5 Pro: हे वॉच प्रो सह दोन आवृत्त्यांमध्ये येते.यात १.४ -इंच सुपर AMOLED स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन ४५० x ४५० पिक्सेल आहे. One UI घड्याळासह, Wear OS इंटरफेस उपलब्ध आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, ते Android Wear OS 3.5 वर आधारित One UI Watch 4.5 वर काम करते. प्रोसेसरसाठी, ते ड्युअल कोर Exynos W920 (5 nm) ने सुसज्ज आहे. स्टोरेजसाठी, यात 1.5GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, ५९० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी १० W चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा :फोनमध्ये डझनभर Apps असतील तरी चालेल, पण हे ३ लगेच काढून टाका, प्रायव्हसीला मोठा धोका

Apple Watch Series 7

apple-watch-series-7

Apple Watch Series 7: Apple Watch Series 7 ला १.९ – इंच रेटिना LTPO OLED स्क्रीन मिळते, ज्याचे रिझोल्यूशन ४८४ x ३९६ पिक्सेल आहे आणि ते ऑल्वेज ऑन डिस्प्ले तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. One UI घड्याळासह, Wear OS इंटरफेस उपलब्ध आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हे watch OS 9.1 वर काम करते. प्रोसेसरसाठी ते ड्युअल कोअर Apple S7 ने सुसज्ज आहे. स्टोरेजसाठी यात 1GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, ३०९ mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Huawei Watch 3

huawei-watch-3

Huawei Watch 3: Huawei Watch 3 मध्ये १.४३ -इंच AMOLED स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन ४६६ x ४६६ पिक्सेल आहे आणि ते ऑल्वेज ऑन डिस्प्ले तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे watchOS 9.1 वर काम करते. प्रोसेसरसाठी ते ड्युअल कोअर Apple S7 ने सुसज्ज आहे. स्टोरेजसाठी यात 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात WLAN, ब्लूटूथ 5.2, GPS आणि NFC आहे. यात 450 mAh बॅटरी आहे जी एका चार्जवर ३ दिवस टिकू शकते. यात स्पीकर आणि मायक्रोफोन आहे. याला ५ एटीएम रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ते पाण्यातही वापरले जाऊ शकते.

वाचा: फोनमधील महत्वाचा Data Leak होण्याची भीती वाटतेय ? या चुका टाळा, डिव्हाइस राहील नेहमी सेफ

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here