नवी दिल्लीः असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. मोठी बॅटरी असलेल्या फोनची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने हा फोन थेट सॅमसंगच्या फोनला टक्कर देऊ शकतो. इनफिनिक्स ने भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आज लाँच केला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये ६.८२ इंचाचा स्क्रीन दिली आहे.

वाचाः

Infinix Smart 4 Plus ची किंमत
इनफिनिक्स स्मार्ट ४ प्लसला कंपनीने ७ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. हँडसेट मिडनाइट ब्लॅक, ओशल वेव आणि वायलट कलरमध्ये मिळणार आहे. स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर २८ जुलैपासून सुरू होणार आहे. या फोनच्या खरेदीवर फ्लिपकार्टवरून अॅक्सिस बँक कार्ड वर ५ टक्के अनलिमिटेड आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डसोबत ५ टक्के सूट दिली जाणार आहे. फोनला ८८९ रुपयांच्या प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी केले जावू शकते.

वाचाः

Infinix Smart 4 Plus ची वैशिष्ट्ये
इनफिनिक्स च्या या फोनमध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन दिला आहे. याचे आस्पेक्ट रेशियो 20.5:9 आहे. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए25 प्रोसेसर दिला आहे. ३ जीबी रॅम व इनबिल्ट ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. स्मार्टफोन अँड्रॉयड 10 बेस्ड XOS 6.2 वर काम करतो.

वाचाः

इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ३.५ एमएम ऑडियो जैक, 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, मायक्रो-यूएसबी यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये DTS-HD सराउंड साउंड दिला आहे. स्मार्टफोनमध्ये पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली आहे. १० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमद्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सर सपोर्ट करतो. फोनमध्ये ड्यूल एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here