मुंबई : प्रतिनिधी
वाहतूक कोंडीतून सहज मार्ग काढता यावा यासाठी नाशिकमधील तरुणांनी भारतीय बनावटीची एअर टॅक्सी नाशिकमधील सहा जणांनी एकत्र येऊन बनवली आहे. हवेतून उडणारी टॅक्सी असून यासाठी आवश्यक चाचण्या सध्या सुरू असून, आगामी दोन ते तीन वर्षात ही गाडी नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ही टॅक्सी आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये आली आहे.

आयआयटी मुंबईतील टेकफेस्टमध्ये होणार्या तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनात देशा-विदेशातील तंत्रप्रेमी विद्यार्थी सहभाग झाले आहेत. याच महोत्सवात नाशिक येथील तरुणांचा हवाई टॅक्सीही चर्चेचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यावर वाहतूककोंडीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे.

या प्रवासासाठी सध्या साधारण टॅक्सी किंवा खासगी टॅक्सीसाठी किमान 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. मात्र या एअर टॅक्सीमुळे प्रवाशांना फक्त 50 ते 75 रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडण्याबरोबरच वाहतूक कोंडीपासूनही एअर टॅक्सीमुळे सुटका होणार आहे. एअर टॅक्सी बनवण्यासाठी नाशिकमधील सहा जणांनी एअरोहंस नावाची कंपनी स्थापन केली आहे. आयआयटी मुंबईमध्ये सुरू असलेल्या टेकफेस्टमध्ये एअर टॅक्सी प्रदर्शनला ठेवण्यात आली आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमानुसार एअर टॅक्सीची निर्मिती करण्यात आली आहे. ही टॅक्सी विजेवर चालणार असल्याने इंधन बचतीच्या दृष्टीने ही टॅक्सी फार महत्त्वाची असून सर्व परवानगीचे सोपस्कार केले जात असून त्यानंतरच ही सेवेत येणार आहे.

इव्हिटॉल तंत्रज्ञान उडवणार टॅक्सी..
हवेमध्ये उड्डाण घेण्यासाठी विमानाला धावपट्टीची आवश्यकता असते. धावपट्टीवरून वेग घेऊनच विमानाला हवेत उड्डाण करता येते. परंतु जागेची उपलब्धता लक्षात घेत एअर टॅक्सीमध्ये इव्हिटॉल तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग तंत्रज्ञान (इव्हिटॉल) म्हणजे एकाच जागेवरून हेलिकॉप्टरप्रमाणे हवेमध्ये उड्डाण घेता येणार आहे.

चालकविना चालणारी हवाहवाई
रस्त्यात हात दाखवून टॅक्सी थांबवणे किंवा मोबाइलवर अ‍ॅपवरुन टॅक्सी बुक करावी लागणार नाही तर ही टॅक्सी विनापायलट चालणार आहे. टॅक्सी हवेत उडण्यासाठी उभारण्यात येणार्या ड्रोन पोर्टवरून टॅक्सीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्णत: भारतीय बनावटीचे लाईट कंट्रोल तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून हवाई स्वरुपाची टॅक्सी आहे.

-पॅराशूटची सुविधा
एकदा चार्ज केल्यावर ती 30 मिनिटे हवाई अंतर पार करणार, जमिनीपासून 2 हजार मीटर उंच व प्रति तास 120 किलोमीटर वेग, रनवेवर न धावता टेक-ऑफ आणि लँडिंग सुविधा

फायद्याचे काय ?
वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटकारा, वाहतूकी कोंडी नसल्याने वेळ वाचणार, वीजेवर चालणार असल्याने पैसा व पेट्रोल वाचणार, प्रदूषणही होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here