नवी दिल्लीः Elon Musk ने Twitter Blue सब्सक्रिप्शन रिलाँच केले आहे. याआधी फेक अकाउंट्सला ब्लू टिक मिळाल्यानंतर या सब्सक्रिप्शन सर्विसला बंद करण्यात आले होते. याशिवाय, ट्विटर अकाउंट्सला वेगवेगळे कलरचे टिक सुद्धा दिले जात आहे. ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनची किंमत आता उघड करण्यात आली आहे. याची किंमत ऑपरेटिंग सिस्मटनुसार, वेगवेगळी आहे. ट्विटरला वेबवर अॅक्सेस करण्यासाठी यूजर्सला ८ डॉलर म्हणजेच जवळपास ६५० रुपये प्रति महिना खर्च करावे लागतील. तर अॅपल कंपनीचा आयफोन वापरणाऱ्या यूजर्सला यासाठी ११ डॉलर दर महिना खर्च करावा लागणार आहे.

वेगवेगळ्या कलरचे टिक

यावर ट्विटरकडून वेगवेगळ्या कलरचे टिक दिले जात आहे. कंपनीसाठी गोल्ड चेकमार्क दिले जात आहे. तर सरकारसाठी ग्रे चेकमार्क दिले जात आहे. परंतु, पर्सनलसाठी अजून तरी ब्लू टिक दिले जात आहे. दर व्हर्जच्या एका रिपोर्टनुसार, याआधी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनला अनेक अलर्ट दिल्यानंतरही जारी करण्यात आले होते. यामुळे अनेक फेस अकाउंट्सला ब्लू टिक मिळाले होते. त्यांच्या फेक ट्विट्स मुळे ओरिजनल कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते.

twitter blue accounts

वाचाः ५ हजाराचा boAt Headphone मिळतोय दीड हजारात, पाहा डिस्काउंट ऑफर

सरकार संबंधी अकाउंट्सच्या खाली लेबल
ट्विटरवर नवीन अपडेट नंतर सरकार संबंधित अकाउंट्सच्या खाली लेबल दिले जात आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या अकाउंट्सच्या खाली पाहिले जावू शकते. यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, इंडियन गव्हर्मेंट ऑफिशियलचे अकाउंट आहे. सध्या कंपनीने भारतातील किंमतीवरून काही म्हटले नाही. त्यामुळे हे स्पष्ट नाही की, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी भारतात किती रुपये खर्च करावे लागतील. कंपनी लवकरच यासंबंधी माहिती देवू शकते. ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेणाऱ्यांना अतिरिक्त बेनिफिट्स दिले जाते. यूजर्सला कमी जाहिराती पाहायला मिळू शकतात.

वाचाः उन्हाळा सुरू होण्याआधी खरेदी करा एसी, ७४ हजाराचा AC फक्त २२ हजारात मिळतोय

वाचाः ५५९९ रुपयाची स्मार्टवॉच फक्त १२९९ रुपयात मिळतेय, १५ दिवसाचा बॅटरी बॅकअप

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here