Poco Smartphones : चीनी टेक कंपनी Poco च्या सर्व लोकप्रिय स्मार्टफोन्सवर डिस्काउंटचा लाभ देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमुळे, विशेष ऑफरसह अनेक पोको डिव्हाइसेस मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. जर तुम्ही नवीन वर्षासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, एकापेक्षा एक जबरदस्त डील्स तुम्हाला मिळू शकतात. Flipkart Big Saving Days सेल दरम्यान, जवळ- जवळ सर्व पोको स्मार्टफोन्सवर सूट दिली जात आहे. हा सेल १२ डिसेंबरपासून प्लॅटफॉर्मवर सुरू झाला असून यादरम्यान बँकेच्या ऑफर्सचा लाभही दिला जात आहे. विशेष म्हणजे डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आलेल्या फोन्समध्ये सर्व मॉडर्न फीचर्स उपलब्ध आहेत. यापैकी काही फोन्सच्या बॅक पॅनलवर 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर, काहींची बॅटरी आणि प्रोसेसर मजबूत आहेत. पाहा लिस्ट आणि खरेदी करा बेस्ट फोन .

Poco M4 Pro 5G

poco-m4-pro-5g

POCO M4 Pro 5G: 4GB स्टोरेज आणि 64GB स्टोरेजसह येणारे डिव्हाइसचे बेस मॉडेल १४,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याच्या सर्व प्रकारांवर २७५० रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये कोटक क्रेडिट कार्डसह ७५० रुपयांची सूट समाविष्ट आहे. MediaTek Dimensity 810 व्यतिरिक्त, फोनला ९० Hz ६.६ -इंच FHD + डिस्प्ले मिळतो आणि त्याची ५००० mAh बॅटरी३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. Poco M4 Pro 5G मध्ये मागील पॅनलवर 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि तो तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

वाचा : फोनमधील महत्वाचा Data Leak होण्याची भीती वाटतेय ? या चुका टाळा, डिव्हाइस राहील नेहमी सेफ

Poco C31

poco-c31

POCO C31: स्वस्तात फोन खरेदी करायचा असल्यास हा सर्वात बेस्ट फोन आहे. कमी किमतीत बेस्ट फीचर्स यात तुम्हाला मिळतील. बजेट डिव्हाइस ६४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते आणि त्याच्या सर्व प्रकारांवर २००० रुपयांची सवलत मिळत आहे. SuperCoins च्या साहाय्याने २५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते. Poco C31 मध्ये Mediatek Helio G35 प्रोसेसर देण्यात आले आहे. कॅमेराबद्दल सांगायचे तर, फोनमध्ये १३ MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि मोठी ५००० mAh बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

वाचा : तब्बल १५० कोटी Accounts डिलीट करण्याच्या तयारीत Twitter, पाहा तुमच्या अकाउंटला तर धोका नाही?

POCO M4 Pro AMOLED

poco-m4-pro-amoled

POCO M4 Pro AMOLED : पॉवरफुल डिव्हाइस १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर ५५०० रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे, ज्यात कोटक क्रेडिट कार्डसह उपलब्ध १००० रुपयांची सूट समाविष्ट आहे. फोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले आणि ६४ MP प्रायमरी ट्रिपल कॅमेरासह १६ MP सेल्फी कॅमेरा मिळतो. Media Tek Helio G 96 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे.

वाचा: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड तासनतास लपून छपून फोनवर कुणाशी बोलतात? करा माहित, मुलांवरही ठेवा लक्ष

Poco M4 5G

poco-m4-5g

Poco M4 5G: या M-सिरीज Poco फोनवर देखील मोठी सूट देण्यात येत आहे आणि तो १०९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. बँक कार्डसह १५०० रुपयांपर्यंत सूट आणि कोटक क्रेडिट कार्डसह १००० रुपयांपर्यंतची सूट फोनवर मिळू शकते. Media Tek Dimensity 700 सह या फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेटसह FHD+ डिस्प्ले आहे. यात ५० MP AI ड्युअल कॅमेरासह ५००० mAh बॅटरी आहे. कमी किमतीत येणारा हा पोको प्लान तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा : Call Recording: फोनवर बोलताना असा आवाज येतोय ? व्हा अलर्ट, रेकॉर्ड होतोय तुमचा कॉल

Poco X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

Poco X4 Pro 5G: Poco सेल दरम्यान फोनवर ३५०० रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये SBI बँक कार्ड्सवर २००० रुपयांपर्यंत सूट आणि क्रेडिट कार्ड्सवर १००० रुपयांपर्यंत सूट समाविष्ट आहे. हा फोन १४४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत (6GB + 64GB बेस व्हेरिएंटसाठी) खरेदी केला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह १२० Hz सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याची ५००० mAh बॅटरी ६७ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते आणि मागील पॅनलमध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी ८ MP अल्ट्रा-वाइड आणि २ MP मॅक्रो सेन्सर्ससह ६४ MP प्राथमिक कॅमेरा आहे.

Poco F4 5G

poco-f4-5g

Poco F4 5G: Poco F4 5G वर ५००० रुपयांच्या सवलतीचा लाभ घेता येईल आणि फोन २२,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. यामध्ये SBI बँक कार्डवर २००० रुपयांपर्यंत सूट आणि कोटक क्रेडिट कार्डवर १००० रुपयांची सूट समाविष्ट आहे. हा फोन तीन वेगवेगळ्या प्रकारात खरेदी करता येईल. कंपनीच्या पॉवरफुल डिव्हाइस Poco F4 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटसह ६.६७-इंच AMOLED स्क्रीन आहे. शक्तिशाली कॅमेरा व्यतिरिक्त, डॉल्बी व्हिसन आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह आलेल्या या फोनमध्ये ६७ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा : Airtel चे सुपरहिट प्लान्स, रोज 3GB Data, ३ महिन्यांपर्यंतच्या व्हॅलिडिटीसह Amazon Prime फ्री

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here