वाचाः
या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. वनप्लस ८ सीरीज प्रमाणे OnePlus Nord स्मार्टफोन मध्ये ५जी सपोर्ट दिला आहे.
वाचाः
स्मार्टफोनची किंमत
OnePlus Nord स्मार्टफोन ६ जीबी रॅम प्लस ६४ स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज या तीन व्हेरियंटमध्ये आले आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा व्हेरियंट केवळ भारतात लाँच करण्यात आला आहे. याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन सप्टेंबर मध्ये उपलब्ध होणार आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही व्हेरियंट ४ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. सर्व प्रमुख बँकेच्या कार्डवर नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन मिळणार आहे. तर जिओ युजर्संना ६ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळतील.
वाचाः
दोन कलरमध्ये OnePlus Nord
फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोनच्या बॅकला आणि फ्रंटला कॉर्निंग गोरीला ५ ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे.
वाचाः
या फोनमध्ये ६ कॅमेरे
OnePlus Nord च्या बॅकला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर दिला आहे. तसेच फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. फोनच्या फ्रंटला २ कॅमेरे दिला आहे. फोनच्या फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड इमेज सेन्सर दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times