नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन ३० जुलैला लाँच करण्यात येणार आहे. सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन Galaxy M31s ३० जुलैला लाँच करणार असून या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमध्ये नजर आला आहे. यावरून या फोनचे फीचर्स आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम३१एस मध्ये कंपनीने Exynos 9611 प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंगसाठी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

फोनमध्ये हे वैशिष्ट्ये
MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 1,080×2,400 पिक्सल रेजॉलूशनचा डिस्प्ले मिळणार आहे. हा सुपर एमोलेड फुलHD+ डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि पंच होल सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये 6,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाणार आहे. कंपनी आपल्या एम सीरीज अंतर्गत या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी दिली आहे.

वाचाः

किंमत किती
सॅमसंग गॅलेक्सी M31s ची भारतात जवळपास २० हजार रुपये असू शकते. फोनमध्ये ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज ऑप्शनसोबत हा फोन येणार आहे. या सीरीजचा जुना फोन Galaxy M31 ला कंपनीने १५ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here