डिजिटल बाजारात अनेक स्मार्टफोनची लाँचिंग करण्यात आली आहे. २०२२ हे वर्ष संपायला आता अवघे १० दिवस उरले आहे. तुम्हाला २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही फोन्सची लिस्ट या ठिकाणी देत आहोत. या वर्षात २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत वनप्लसने आपला स्मार्टफोन लाँच केला होता. नंतर रियलमी, ओप्पो, विवो, मोटो आणि आयक्यू सोबत सॅमसंग सारख्या कंपनीने फोनची लाँचिंग केली. जर तुम्हाला कमी किंमतीत बेस्ट स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी माहिती देत आहोत. २०२२ मध्ये भारतात लाँच करण्यात आलेले २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट ५ स्मार्टफोनची माहिती या ठिकाणी देत आहोत. फोनची किंमत आणि फीचर्स सविस्तर जाणून घ्या.

​POCO X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

पोकोच्या या फोनची सुरुवातीची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. या किंमतीत ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज मिळते. या फोनला यावर्षी मार्च महिन्यात लाँच करण्यात आले. हा एक ऑलराउंडर फोन आहे. फोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा ब्राइटनेस १२०० निट्स आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये 67W ची फास्ट चार्जिंग दिली आहे.

वाचाः 7000mAh बॅटरीच्या Tecno Pova 3 च्या किंमतीत २ हजाराची कपात

POCO X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये 67W ची फास्ट चार्जिंग दिली आहे. POCO X4 Pro 5G मध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. सोबत 67W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. या फोनला सेलमध्ये १३ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः फोनवर वारंवार येणाऱ्या प्रमोशनल कॉल्सपासून मिळवा सुटका, फॉलो करा टिप्स

​OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G कंपनीचा आतापर्यंत सर्वात कमी किंमतीतील फोन आहे. फोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619 जीपीयू दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे मिळते. ज्यात प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मिळतो.

वाचाः १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजचा फोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

OnePlus Nord CE 2 Lite 5G​

oneplus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मिळतो. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबत फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी दिली आहे. ३३ वॉटची सुपरवूक फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. फोनला ६ जीबी रॅम सोबत १२८ जीबीचे स्टोरेज दिले असून या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

वाचाः आयफोन वापरताय, पण IPhone मधील I चा अर्थ काय आहे, माहिती आहे?

​Realme 10 Pro 5G

realme-10-pro-5g

Realme 10 Pro 5G फोनला नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या फोनला १८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. Realme 10 Pro 5G सोबत अँड्रॉयड १३ आधारित रियलमी यूआय ४.० मिळतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. जो (2400 ×1080 पिक्सल) रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसर मिळतो. Realme 10 Pro 5G मध्ये प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा आणि सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे.

वाचाः Scam Alert! प्लीज, फोन द्या अर्जंट एक कॉल करायचा आहे, स्कॅमर्सचा गुन्हा करण्याचा नवा फंडा

Realme 10 Pro 5G

realme-10-pro-5g

जो (2400 ×1080 पिक्सल) रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसर मिळतो. Realme 10 Pro 5G मध्ये प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा आणि सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा मिळतो. रियलमीच्या या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी सोबत ३३ वॉट सुपरवूड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. फोन सोबत मेटल फ्रेम डिझाइन मिळते.

वाचाः जिओ Cattle tracker पासून वेगळ्या डिव्हाइसपर्यंत, यावर्षी लाँच झाले हे टॉप ५ यूनिक गॅझेट्स

​Redmi Note 11 Pro Plus 5G

redmi-note-11-pro-plus-5g

Redmi Note 11 Pro Plus 5G ला १९ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. फोनमध्ये ६.६७ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि ८ जीबी पर्यंत रॅम व २५६ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. जो १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर सोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते. 67 वॉटच्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये सर्वात चांगली क्वॉलिटी पाहायला मिळते.

वाचाः १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजचा फोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

​Samsung Galaxy F23 5G

samsung-galaxy-f23-5g

सॅमसंगच्या Samsung Galaxy F23 5G या फोनला २३ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. परंतु, आता या फोनला १६ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. Samsung Galaxy F23 5G मध्ये अँड्रॉयड १२ आधारित One UI 4.1 मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी डिस्प्ले दिला आहे. जो १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, ६ जीबी पर्यंत रॅम आणि ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सोबत १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.

वाचाः आयफोन वापरताय, पण IPhone मधील I चा अर्थ काय आहे, माहिती आहे?

Samsung Galaxy F23 5G

samsung-galaxy-f23-5g

जो १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, ६ जीबी पर्यंत रॅम आणि ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सोबत १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सलचा सॅमसंगचा ISOCELL JN1 सेंसर दिला आहे. या फोनमध्ये पॉवर साठी 5,000 एमएएचची बॅटरी दिली आहे. यासोबत २५ वॉटची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. या फोनला एक्वा ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर मध्ये येतो.

वाचाः 7000mAh बॅटरीच्या Tecno Pova 3 च्या किंमतीत २ हजाराची कपात

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here