Best iPhone Offers: आयफोन खरेदी करायचा पण, बजेटचे टेन्शन असेल तर, आता काळजीचे कारण नाही. Apple डेज सेल Christmas 2022 च्या आधी लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरू झाला असून या सेल दरम्यान सर्वात कमी किमतीत नवीन आणि जुने iPhone मॉडेल्स खरेदी करण्याची संधी आहे. iPhone 11 पासून iPhone 14 पर्यंत अनेक मॉडेलसवर सेलमध्ये बंपर सूट आणि ऑफर मिळत आहेत. Flipkart Apple Days सेल दरम्यान ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड, कोटक बँक डेबिट कार्ड आणि Flipkart Axis बँक कार्ड्ससह पैसे भरणार्‍यांना अतिरिक्त सूट देत आहे. याशिवाय, जुन्या आयफोन किंवा अँड्रॉइड डिव्हाइसच्या एक्सचेंजच्या बाबतीत, तुम्हाला २०,५०० रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सवलतीचा लाभ देखील मिळू शकतो. तुम्ही सेलमध्ये हे आयफोन मॉडेल्स सवलतीत खरेदी करू शकता. या डील्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

iPhone 14 Plus

iphone-14-plus

iPhone 14 Plus : २०२२ मध्ये Apple ने मोठ्या स्क्रीन आकारासह iPhone 14 Plus मॉडेल देखील सादर केले आहे, ज्याची किंमत भारतात ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. सवलत आणि ऑफरनंतर हे डिव्हाइस ८३,७४० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे. जो 1284 × 2778 पिक्सल रिजॉल्यूशन ऑफर करते. हँडसेट मध्ये १२०० निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी ए १५ बायोनिक चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

वाचा : थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी

iPhone 13 Pro

iphone-13-pro

iPhone 13 Pro: iPhone 13 Pro मॉडेल खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत भारतात १,६९,९०० रुपयांपासून सुरू होते. परंतु, तुम्हाला सेलमध्ये १,३६,७९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळत आहे. एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटमुळे त्याची किंमत आणखी खाली येईल.

iPhone 13 Pro Max: आयफोन 13 लाइनअपमधील सर्वात शक्तिशाली डिव्हाइस, iPhone 13 Pro Max ची किंमत भारतात १,७९,९०० रुपयांपासून सुरू होते. हे Device सेल दरम्यान १,४३,६९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि बँक किंवा एक्सचेंज ऑफरसह आणखी कमी केले जाऊ शकते.

वाचा : Xiaomi च्या ‘या’ पॉवरपॅक्ड स्मार्टफोनवर १८,५०० रुपयांपर्यंचा ऑफ, फोन १७ मिनिटांत होतो चार्ज

iPhone 14

iphone-14

iPhone 14 : नवीन iPhone 14 ची किंमत भारतीय बाजारपेठेत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते. परंतु, विक्रीदरम्यान तो ७३,४९० रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. जर तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ मिळत असेल तर, ते आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. iPhone 14 मध्ये ६.१ -इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ६० Hz रिफ्रेश रेटसह येतो. आयफोन 14 स्मार्टफोन A15 बायोनिक चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे, ज्यामध्ये ड्युअल परफॉर्मन्ससह 6-कोर CPU आणि 4 कार्यक्षमता कोर, 5-कोर GPU आणि 16-कोर न्यूरल इंजिन आहे.

वाचा : थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी

iPhone 12 Mini

iphone-12-mini

iPhone 12 Mini: ज्यांना कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आवडतात त्यांच्यासाठी iPhone 12 Mini पेक्षा चांगली डील असू शकत नाही. या 5G iPhone मॉडेलची किंमत भारतात ५९,९०० रुपयांपासून सुरू होते परंतु ऑफर आणि सवलतींनंतर, ते केवळ ३७,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी केले जाऊ शकते.

iPhone 13: iPhone 13 ची किंमत 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी ६९,९०० रुपयांपासून सुरू होते. परंतु, बँक ऑफर आणि सवलतींनंतर ६१,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येते. A15 बायोनिक चिप व्यतिरिक्त, फोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि सिनेमॅटिक मोड सपोर्ट देखील आहे.

iPhone 11

iphone-11

iPhone 11: जुन्या अँड्रॉइड डिव्हाईसवरून Apple च्या इकोसिस्टमवर जायचे असेल, तर iPhone 11 कमी किमतीत खरेदी करता येईल. बेस व्हेरिएंटसाठी त्याची किंमत ४३,९९० रुपयांपासून सुरू होते. परंतु सेल दरम्यान, तुम्हाला ऑफरसह ३९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

iPhone 12: iPhone ची सुरुवातीची किंमत ७४,९०० रुपये आहे. मोठ्या डिस्काउंटनंतर हे डिव्हाइस ५०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, हे मॉडेल आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. कॅमेरा ते डिस्प्ले करण्यासाठी हा एक मजबूत पर्याय आहे आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

वाचा:Smartphone मध्ये अचानक ‘असे’ बदल दिसत असतील तर व्हा अलर्ट, Hacking ची दाट शक्यता

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here