नवी दिल्लीः सॅमसंगचा स्वस्त एन्ट्री लेवल स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. अँड्रॉयड गो एडिशन सोबत येत असलेला हा फोन १ जीबी रॅम आणि 1.5Hz क्वॉड-कोर प्रोसेसर यात देण्यात आले आहे. फोनला १६ जीबी आणि ३२ जीबीच्या इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनला सध्या इंडोनेशियात लाँच केले आहे. इंडोनेशियात या फोनची किंमत ५५०० रुपये आहे.परंतु, २३ जुलै पर्यंत हा फोन ५ हजार रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ब्लू, ब्लॅक आणि रेड या तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे. या फोनला कंपनी लवकरच भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

Galaxy A01 Core चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 720×1480 पिक्सल रेजॉलूशन देण्यात आले आहे. फोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी+ TFT LCD डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये कोणता प्रोसेसर दिला आहे. याची माहिती कंपनीने अद्याप दिली नाही. परंतु, या फोनमध्ये क्वॉड कोर चिपसेट दिला आहे. फोनला मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. याचा स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा दिला आहे. 4x पर्यंत डिजिटल झूप सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये ऑटो फोकस सपोर्ट फीचर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, १७ तासांपर्यंत ४ जी टॉकटाईम देते. तर १४ तासांपर्यंत वाय फाय इंटरनेट युजेस मिळतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ वर्जन 5.0, 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रो यूएसबी पोर्ट, वाय-फाय 802.11 b/g/n, जीपीएस, ग्लोनास यासारखे फीचर्स मिळतात.

वाचाः वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here