OnePlus Offers : नामांकित चीनी टेक कंपनी OnePlus ची उत्पादने त्यांच्या पॉवरफुल फीचर्समुळे आणि प्रीमियम हार्डवेअर गुणवत्तेमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक युजर्स हे प्रोडक्ट्स खरेदी करणेच पसंत करतात. तुम्हालाही वनप्लसचा मोबाईल, स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असतील तर आता त्यांना खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही. OnePlus स्मार्टफोन्सपासून ते स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टवॉचपर्यंत ठराविक डिव्हाईस नवीन वर्षाच्या आधी सवलतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही खूप कमी रक्कम खर्च करून कंपनीच्या इकोसिस्टमचा एक भाग बनू शकता. सर्वात कमी किमतीत आणि मोठ्या सवलतीत तुम्ही कोणती OnePlus उत्पादने खरेदी करू शकता? आणि या डिव्हाइसेसवर किती ऑफ मिळत आहे? तसेच, त्यामध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहे , त्याबद्दल जाणून घेऊया. लिस्टमध्ये OnePlus Nord CE 2 Lite 5G, OnePlus Y1S HD टीव्हीचा देखील समावेश आहे.

One Plus Smart TV

one-plus-smart-tv

OnePlus Y1S HD रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही : सर्वात स्वस्त OnePlus स्मार्ट टीव्ही ३२-इंचाच्या डिस्प्लेसह येतो आणि त्याची किंमत २१,९९९ रुपये आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर १५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी, बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटचा पुरेपूर फायदा घेऊन १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. बेझल-लेस फ्रेमसह येणारा हा स्मार्ट टीव्ही HD रेडी डिस्प्ले व्यतिरिक्त Android TV ऑपरेटिंग सिस्टमसह येतो आणि २० W साउंड आउटपुट व्यतिरिक्त Netflix, Prime Video, Disney + Hotstar आणि YouTube सारख्या OTT अॅप्सला सपोर्ट करतो.

वाचा: नवे-जुने सर्वच iPhone झाले स्वस्त, मिळतोय ३३,००० रुपयांपर्यंतचा तगडा डिस्काउंट, पाहा डील्स

One Plus Nord Earphones

one-plus-nord-earphones

One Plus Nord Earphones : जर तुम्हाला OnePlus ऑडिओ उत्पादन कमी किंमतीत खरेदी करायचे असेल, तर OnePlus Nord वायर्ड इअरफोन्स १२९९ रुपये किमतीत लाँच केले गेले आहेत. परंतु, Amazon वर इअरफोन्स ७९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळत आहे. निवडक बँक कार्ड्ससह यावर १५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ३.५ मिमी ऑडिओ जॅक आणि माइकसह येत असलेल्या, या इअरफोन्सना ९.२ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्ससह बेस मिळतो आणि त्यांच्या मदतीने कॉलिंग सहज करता येते. काळ्या रंगात इन-इयर वायर्ड इअरफोन्स खरेदी करण्याचा पर्याय आहे.

वाचा: पहिल्यांदाच इतका स्वस्त मिळतोय लाख रुपये किमतीचा Samsung चा फ्लॅगशिप फोन, पाहा ऑफर्स

OnePlus Nord Watch

oneplus-nord-watch

OnePlus Nord Watch : OnePlus च्या स्वस्त स्मार्टवॉचची भारतात किंमत ६९९९ रुपये आहे. परंतु, Amazon वरून ४९९८ रुपयांना खरेदी करता येईल. बँकेच्या ऑफरमुळे ग्राहक हे घड्याळ आणखी कमी किमतीत खरेदी करू शकतात. OnePlus स्मार्टवॉच, जे १.७८ इंच AMOLED डिस्प्लेसह येते, त्यात १०५ फिटनेस मोड, १० दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ, SpO2, हार्ट रेट सेन्सर्स, स्ट्रेस मॉनिटर आणि महिलांसाठी आरोग्य ट्रॅकर यांसारखी फीचर्स आहेत. तसेच, स्क्वेअर डायल असलेले हे स्मार्टवॉच अनेक Watch Faces सह येते.

OnePlus Nord CE 2 Lite

oneplus-nord-ce-2-lite

OnePlus Nord CE 2 Lite 5G: OnePlus चा सर्वात स्वस्त फोन म्हणजे OnePlus Nord CE 2 Lite 5G, ज्याच्या किमती भारतीय बाजारपेठेत १९,९९९ रुपयांपासून पासून सुरू होतात. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेले हे वेरिएंट Amazon वर १८,९९९ रुपयांना लिस्ट केले गेले आहे. परंतु १३,३०० रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटशिवाय काही बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यानंतर त्याची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी असेल. फोनमध्ये ६४ MP ट्रिपल कॅमेरा, ६.५९ इंच १२० Hz डिस्प्ले आहे. त्याची ५००० mAh बॅटरी ३३ W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येते.

वाचा: थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here