वाचाः
जेली २ चे खास वैशिष्ट्ये
कंपनीने आधीच्या तुलनेत मोठी स्क्रीन, दोन पट बॅटरी लाइफ, अपग्रेड कॅमेरा आणि जीपीएस सेन्सर दिले आहे. कंपनीने यावेळी फोनला क्रेडिट कार्डच्या साईज इतके बनवले आहे. फोनमध्ये ३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जे 480×384 रेजॉलूशन पिक्सल आहे. स्क्रीन साईज मध्ये २० टक्के वाढ केली आहे. फोनमध्ये टाइप करणे थोडे कठीण काम आहे.
वाचाः
कंपनीने सांगितले की, फोनचा डिस्प्ले छोटा आहे. परंतु, याची जबरदस्त क्वॉलिटी मुळे चित्रपट पाहणे आणि गेम खेळणे खूपच भारी आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ६० प्रोसेसर मिळतो. हा एक मिड रेंज चिपसेट आहे. फोनमध्ये 2000mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः
कॅमेरा आणि फिंगरप्रिंट
या छोट्या फोनमध्ये कंपनीने फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मागे १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच, सिक्योरिटी राहावी म्हणून फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत १२९ डॉलर (९ हजार ६०० रुपये) ठेवली आहे.
वाचाः वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times