Micromax In 2C

Micromax In 2C: सेलमध्ये या फोनची किंमत ९४९९ रुपयांवरून ५९९९ रुपयांवर आली आहे. Flipkart Axis Bank कार्डधारकांना फोनवर ५ % कॅशबॅक देखील मिळेल. हा मायक्रोमॅक्स IN 2C ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. कंपनी या फोनमध्ये ६.५२ इंच HD+ डिस्प्ले देत आहे. याच्या मागील बाजूस८ मेगापिक्सेल आणि समोर ५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. गिफ्ट देण्याकरिता मायक्रोमॅक्स IN 2C एक चांगला पर्याय आहे. तसेच, जर तुमचे बजेट ६००० पेक्षा कमी असेल तर तुम्ही या फोनचा नक्कीच विचार करू शकता.
वाचा : थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी
Infinix Smart 6

Infinix Smart 6: या फोनची एमआरपी ८९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही आता फ्लिपकार्टवर ६४९९९ रुपयांना खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डधारकांना या फोनच्या खरेदीवर ५ % अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल. हा Infinix Smart 6 फोन ६.६ -इंचाच्या HD+ डिस्प्लेने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, तुम्हाला फोनच्या मागील बाजूस ८-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. याशिवाय कंपनी फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आणि MediaTek Helio A22 चिपसेट देखील देत आहे. कमी खर्चात हा देखील एक चांगला पर्याय आहे.
वाचा: पॉवरफुल प्रोसेसरसह येणाऱ्या Redmi K50i ची किंमत झाली कमी, पाहा फीचर्स
Tecno Pop 5 LTE

Tecno Pop 5 LTE: 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी ६७७६ रुपये आहे. सेलमध्ये डिस्काउंटनंतर तुम्ही Tecno Pop 5 LTE फक्त ६५११ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कोटक बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १००० पर्यंतची सवलत मिळू शकते. कंपनी फोनमध्ये ६.५२ इंचाचा Ra HD+ डिस्प्ले देत आहे. फोटोग्राफीसाठी तुम्हाला यात ८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल. Tecno Pop 5 LTE फोनची बॅटरी ५००० mAh ची आहे .बजेट कमी असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Redmi 9A Sport

Redmi 9A Sport : सवलतीनंतर हा फोन ६८४० रुपयांच्या किंमतीसह फ्लिपकार्टवर लिस्ट झाला आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला १००० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या Redmi 9A स्पोर्ट फोनमध्ये ६.५३ -इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. तसेच, Redmi 9A स्पोर्टफोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा हँडसेट ५००० mAh बॅटरीसह येतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times