चीनमध्ये करोनाने हाहाकार माजवला असून लाखो लोकांना पुन्हा करोना झाला आहे, अशा बातम्या आता समोर येवू लागल्या आहेत. भारतासह जगभरात याची खबरदारी घेतली जात आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात करोना व्हायरस मुळे भारत आणि जगभरात लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. आता चीनमध्ये पुन्हा कोविड रुग्ण वाढले आहे, अशी माहिती टीव्ही माध्यमांवर झळकू लागली आहे. त्यामुळे सर्वच अलर्ट झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या डेटा नुसार, भारतात कोविड १९ चे १३१ नवीन रुग्ण समोर आले आहेत. अॅक्टिव रुग्णाची संख्या कमी होवून ३ हजार ४०८ झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात म्हणजेच करोना काळात अनेक गॅझेट्स मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. जे तुम्हाला सुरक्षित करण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच ५ गॅझेट्स संबंधी माहिती देत आहोत. हे तुमच्या उपयोगी पडू शकतात, जाणून घ्या डिटेल्स.

Pulse Oximeter

pulse-oximeter

Pulse Oximeter : कोविड १० च्या काळात लोकांमध्ये Pulse Oximeter हे खूप लोकप्रिय झाले होते. पल्स ऑक्सिमीटरचा वापर करून यूजर्स आपले ब्लड ऑक्सिजनची लेवल वर नियंत्रण तसेच वेळोवेळ तपासणी करीत होते. हे कोविड काळात खूपच आवश्यक ठरणारे डिव्हाइस आहे. या डिव्हाइसने तुम्ही ऑक्सिजन लेवल चेक करू शकता. तुम्हाला यासाठी डॉक्टरकडे किंवा दवाखान्यात जाण्याची गरज पडत नाही. तुम्ही घरच्या घरी ऑक्सिजन लेवल तपासू शकता.

वाचाः आयफोन वापरताय, पण IPhone मधील I चा अर्थ काय आहे, माहिती आहे?

uv light sanitizer box

uv-light-sanitizer-box

यूव्ही लाइट सॅनेटायझर बॉक्स: एक यूव्ही लाइट सॅनिटायझर बॉक्स सर्व कीटाणू मारण्यासाठी यूव्ही सी लाइट सोबत आपल्या घराला स्वच्छ करीत आहे. मार्केट मध्ये याची किंमत २ हजार ते ४ हजार रुपये दरम्यान आहे. अनेक जनरेकि सॅनेटायझर बॉक्स सोबत उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बॉक्स हे ओजोन कीटाणूनाशक सोबत येतात. काही यूव्ही बॉक्स मध्ये डिव्हाइस सोबत चांगला वास देण्यासाठी अरोमा थरेपी पार्ट सुद्धा असतो. तर अन्य मध्ये टॉपवर एक वायरलेस चार्जिंग पॅड दिला जातो. हे सुद्धा करोना काळात तुम्हाला उपयोगी पडू शकते.

वाचाः नव्या वर्षाआधीच भेट, जिओने २०२३ चा साधला मुहूर्त, २५२ दिवसाच्या वैधतेचा प्लान आणला

uv light sanitizer bar

uv-light-sanitizer-bar

यूव्ही लाइट सॅनेटायझर बार: यूव्ही लाइट सॅनेटायझर बारची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ही एक साधारण स्टीक असते. याच्या एका भागात एक यूव्ही लाइट असते. यूजर्स याला ऑन करू शकतात. याला त्या सामानावर प्वॉइंट करू शकतात. ज्याला ते कीटाणू मारण्यासाठी यूव्ही लाइटने स्वच्छ करायचे आहे. करोना काळात तुम्हाला घर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आरोग्या सुधारण्यासाठी हे तुम्हाला खूपच फायदेशीर ठरू शकते. हे मार्केटमध्ये वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

वाचाः 5G Services : भारतात या स्मार्टफोन्समध्ये मिळते 5G नेटवर्क, फोन्सची संपूर्ण लिस्ट पाहा

hands free door opener

hands-free-door-opener

हँड्स फ्री डोर ओपनर : करोना व्हायरस स्टेनलेस स्टील सारखी लेयर वर तीन दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवू शकतात. काही कंपन्यांनी आधीच हँड्स फ्री डोर ओपनर्स बनवणे सुरू केले आहे. जसे की, हायजीन हूक, ज्याला लंडन बेस्ड डिझायनर स्टीव्ह ब्रूक्स ने बनवले आहे. खिशात फिट होण्यासोबत हे डिव्हाइस खूपच छोटे आहे. करोना काळात हे सुद्धा अनेकांना उपयोगी पडू शकते.

वाचाः IPhone 12 Mini वर मिळतोय मोठा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

infrared thermometer

infrared-thermometer

इन्फ्रारेड थर्मामीटर : जर तुमच्याकडे अनेक पाहुणे येत असतील तर तुमच्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. हे घरात असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसात येणाऱ्या व्यक्तीचे तापमाण मोजू शकता. त्यांची टेस्टिंग करू शकता. तुमच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. करोनाची सध्या फक्त भीती वर्तवली जात आहे. परंतु, जर करोना वाढला तर हे डिव्हाइस तुमच्या सोबत असणे चांगले आहे.

वाचाः Airtel ने आणली भारी ऑफर, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा, हे सब्सक्रिप्शन फ्री

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here