5 Best Laptops in India : बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानानुसार लॅपटॉपचा (Laptop) वापर अधिकाधिक होत गेला. कोरोना (Covid-19) काळात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे बाजारात लॅपटॉपची मागणी जास्त वाढत गेली. तुम्हीसुद्धा नवीन लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही चांगल्या दर्जाच्या लॅपटॉपची माहिती देणार आहोत. हे लॅपटॉप वापरायला अगदी सोयीचे तसेच सर्वाधिक चांगल्या क्वालिटीचे फिचर्स यामध्ये आहेत. 

1. Samsung Galaxy Book2 Pro


Samsung Galaxy Book2 Pro या लॅपटॉपमध्ये i7-1255U प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा लॅपटॉप इंटेल आयरिस XE ग्राफिक्सने सुसज्ज आहे. यात 13.3-इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले आहे, सोबतच 16 GB RAM आणि 512 GB SSD आहे. लॅपटॉपच्या डिव्हाईसबद्दल बोलायचे झाल्यास, याची बॅटरी 18 तासांपर्यंत चालते. या लॅपटॉपमध्ये Windows 11 आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, याची किंमत 59,990 रूपये आहे. 

News Reels

2. Lenovo Ideapad Gaming 3

Lenovo Ideapad Gaming 3 हे पोर्टेबिलिटी, परफॉर्मन्स आणि बेस्ट फिचर्सचा एक पॉवरफुल लॅपटॉप आहे. AMD Ryzen 5 6600H, NVIDIA GeForce RTX 3050 ग्राफिक्स कार्ड आणि 8 GB RAM सह, हा लॅपटॉप ज्यांना गेम खेळण्याची आवड आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. या लॅपटॉपमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 15.6-इंच FHD IPS डिस्प्लेसह येतो. त्याची बॅटरी चांगली आहे आणि जलद चार्जिंगला सपोर्ट करते. हा लॅपटॉप तुम्हाला 54,690 रूपयांना तुम्ही खरेदी करू शकता. 

3. HP Victus


HP Victus Intel Core i7-12450H द्वारे समर्थित आहे. यामध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 512 GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. या लॅपटॉपमध्ये 144 Hz 15.6-इंच फुल एचडी डिस्प्ले आणि Nvidia GeForce GTX 1650 ग्राफिक्स कार्ड देखील आहे. हे गेमिंगसाठी चांगले आहे. हा लॅपटॉप वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.2 ने देखील परिपूर्ण आहे. तसेच, HP Victus USB-A, USB-C, HDMI 2.1 आणि SD कार्ड रीडर पोर्टसह येतो. नवीनतम ऍप्लिकेशन्स आणि गेमला सपोर्ट करण्यासाठी हे Windows 11 होमवर चालते. हा लॅपटॉप तुम्ही 68,990 रूपयांत खरेदी करू शकता.

4. Asus TUF Gaming F15


Asus TUF गेमिंग F15 हा सर्वात पॉवरफुल गेमिंग लॅपटॉपपैकी एक आहे. यात एक आकर्षक, आधुनिक डिझाईन आणि पॉवरफुल क्षमता आहे. या लॅपटॉपमध्ये Intel Core i7-10300H प्रोसेसर आणि गेमिंग आणि इतर मागणी असलेल्या कामांसाठी Nvidia GTX 1650 ग्राफिक्स कार्ड आहे. यात 8 GB RAM आणि 512 GB एसएसडी देण्यात आला आहे. Asus TUF गेमिंग F15 15.6-इंच 1920 x 1080 144 Hz IPS डिस्प्लेसह येतो आणि Windows 11 Home वर चालतो. सिस्टम थंड ठेवण्यासाठी यात ड्युअल सेल्फ-क्लीनिंग फॅन आहेत. या लॅपटॉपची किंमत 56,990 रूपये आहे.

5. Dell Inspiron 15 3511


2022/12/27/60fc5f342e43a46c57f135692738ff5f1672126170817358_original.jpeg” width=”664″ height=”383″ />

Dell Inspiron 15 3511 मध्ये 15.6-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. लॅपटॉप Intel Core i5-1035G1 आणि Intel UHD ग्राफिक्सने सुसज्ज आहे. स्मूथ फंक्शनिंगसाठी यात 16 GB RAM आणि 512 GB NVMe SSD देण्यात आला आहे. नवीन सॉफ्टवेअरला समर्थन देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये विंडोज 11 आहे. यात एक SD कार्ड रीडर, एक USB 2.0, दोन USB 3.2, एक HDMI 1.4, तसेच हेडफोन आणि मायक्रोफोन ऑडिओ जॅक पोर्ट आहेत. या लॅपटॉपची किंमत 55,679 रूपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Netflix Password Sharing: नवीन वर्षात नेटफ्लिक्सचा युजर्सला झटका! पासवर्ड शेअर करता येणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

technology

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here