Best 5G Phones under 15000 rupees: देशात Reliance Jio आणि Airtel लागोपाठ नवीन शहरात 5G नेटवर्क रोलआउट करीत आहे. ५जी चा वापर करण्यासाठी तुमच्या परिसरात ५जी सर्विस शिवाय, तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. Lava, Poco, Redmi सारख्या ब्रँडने स्वस्त किंमतीत ५जी स्मार्टफोन आणले आहेत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी देशात उपलब्ध असलेल्या टॉप ४ स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. या फोनला तुम्ही १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. ऑनलाइनवर मिळत असलेल्या ऑफर्स सोबत फोनवर अतिरिक्त सूट सुद्धा मिळते. तुमचे बजेट जर १५ हजार रुपयांपर्यंत असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी टॉप ४ स्मार्टफोनची माहिती देत आहोत. पाहा फोन्सची यादी व किंमत.

​Lava Blaze 5G

lava-blaze-5g

Lava Blaze 5G फोन देशात उपलब्ध सर्व ५जी बँड सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येवू शकते. फोनचे स्टोरेजचा वापर करून ३ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १२ ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हँडसेट मध्ये ऑक्टा कोर २.२ गीगाहर्ट्ज मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर सोबत येतो. या फोनला १० हजार २५० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर सोबत खरेदी करू शकता. या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः टेम्पर्ड ग्लासमध्ये 2D, 2.5D, 3D, 4D, 5D, 9D, 11D काय आहे?, दुकानदार कसं मुर्ख बनवतात, पाहा

​POCO M4 5G

poco-m4-5g

POCO M4 5G या स्मार्टफोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. पोकोच्या या फोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी व २ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर व बँक ऑफर सोबत डिस्काउंट मिळत आहे.

वाचाः ३४ हजाराचा 5g स्मार्टफोन ८ हजार रुपये स्वस्त मिळतोय, पाहा बेस्ट डील

​Redmi Note 10T 5G

redmi-note-10t-5g

Redmi Note 10T 5G फोनला फ्लिपकार्टवर १२ हजार ९९९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः Vodafone Idea ने लाँच केले २५ आणि ५५ रुपयाचे नवीन प्लान, डेटा आणि म्यूझिकची मजा मिळेल

​Maplin S10 Plus

maplin-s10-plus

Maplin S10 Plus स्मार्टफोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. या किंमतीत ४ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये ५.९९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हँडसेटमध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियरवर २१ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर उपलब्ध आहे.

वाचाः iPhone 13 mini ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी, पाहा बेस्ट ऑफर

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here