भारतीय स्मार्टवॉच बाजार आता खूप वेगाने वाढत आहे. नोव्हेंबर मधील रिसर्च फर्म, काउंटर प्वॉइंटच्या एका रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला होता की, भारतात २०२२ मध्ये स्मार्टवॉच यूजर्सची संख्या सर्वात जास्त आहे. तसेच ही पुढील वर्षी वाढण्याची शक्यता आहे. काही वर्षापूर्वी अनेक स्मार्टवॉचची किंमत ही १० हजार रुपयांपपर्यंत होती. त्यामुळे अनेक जण स्मार्टवॉच खरेदी करीत नव्हते. परंतु, आता मार्केटमध्ये स्वस्त किंमतीच्या स्मार्टवॉच उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यात नॉइज, फायर बोल्ट सारख्या ब्रँड्सने मार्केटमध्ये शाओमी आणि वनप्लस सारख्या ब्रँड्सला चांगली टक्कर दिली आहे. मार्केटमध्ये अनेक स्वस्त किंमतीच्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. या वॉच तुमच्या आरोग्यावर वॉच ठेवतात. तुमच्या हेल्थची काळजी घेण्यास मदत करतात. जाणून घ्या डिटेल्स

​५ हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टवॉच

मार्केटमध्ये ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक स्मार्टवॉच उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हाय एन्ड वॉच जसे, अॅपल वॉच किंवा गॅलेक्सी वॉच सीरीजला जोरदार टक्कर देवू शकतात. या सेगमेंट मध्ये जास्तीत स्मार्टवॉच या चुकीचे हेल्थ डेटा देते. जास्तीत जास्त बजेट स्मार्टवॉच ऑटोमॅटिकली वर्कआउट मोडची माहिती देवू शकत नाही. यूजर्सला हेल्थ मेट्रिक्सचा बरोबर अंदाज मिळत नाही. जी Apple Watches, Fitbits आणि Garmin स्मार्टवॉचमध्ये मिळते. जर तुम्हाला एक नवीन स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत.

वाचाः iPhone 13 mini ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी, पाहा बेस्ट ऑफर

​OnePlus Nord Watch

oneplus-nord-watch

OnePlus ने यावर्षी भारतात आपली पहिली OnePlus Nord Watch लाँच केली आहे. या स्मार्टवॉचची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. या किंमतीत येणारी ही मार्केटमधील सर्वात जास्त व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टवॉच पैकी एक आहे. ही एक शानदार डिस्प्ले अमोलेड पॅनेल सोबत येते. जे लोक वनप्लस स्मार्टफोन वापरतात त्यांच्यासाठी ही वॉच बेस्ट आहे. वनप्लस नॉर्ड वॉच मध्ये मल्टीपल वॉच फेस, स्पोर्ट्स मोड, SpO2, हार्ट रेट, स्ट्रेपस मॉनिटर आणि मँस्ट्रुअल ट्रॅकरचा समावेश आहे. या वॉचची बॅटरी १० दिवसांपर्यंत मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

वाचाः Vodafone Idea ने लाँच केले २५ आणि ५५ रुपयाचे नवीन प्लान, डेटा आणि म्यूझिकची मजा मिळेल

​Realme Watch 3

realme-watch-3

Realme Watch 3 लूक आणि डिझाइन मध्ये खूपच शानदार आहे. ही जवळ जवळ अॅपल वॉच सारखी दिसते. रियलमी वॉच ३ आयफोन सोबत खूप चांगल्या पद्धतीने काम करते. यूजर्स वॉच आणि आयफोनला ब्लूटूथने कनेक्ट केल्यानंतर थेट कॉल करू शकतात. बॅटरी बॅक अप मध्ये कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी ७ दिवसांपर्यंत चालू शकते. या वॉचची किंमत ३ हजार ४९९ रुपये आहे.

वाचाः ३४ हजाराचा 5g स्मार्टफोन ८ हजार रुपये स्वस्त मिळतोय, पाहा बेस्ट डील

​Amazfit Bip 3

amazfit-bip-3

Amazfit Bip 3 जीटीएस सीरीज अंतर्गत काही जबरदस्त स्मार्टवॉच आहेत. ज्यात या वॉचचा समावेश आहे. Amazfit Bip 3 यूजर्सला आरामदायक फिट देते. ही जवळपास योग्य हेल्थ डेटा देते. बॅटरी बॅक अप मध्ये ही एकदा चार्ज केल्यानंतर १० दिवसांपर्यंत बॅटरी बॅक अप देते. अन्य फीचर्स मध्ये यात स्लीप ट्रॅकर, हार्ट रेट, SpO2 आणि अनेक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. या वॉचची भारतातील किंमत ३हजार ४९९ रुपये आहे.

वाचाः टेम्पर्ड ग्लासमध्ये 2D, 2.5D, 3D, 4D, 5D, 9D, 11D काय आहे?, दुकानदार कसं मुर्ख बनवतात, पाहा

​Redmi Watch 2 Lite

redmi-watch-2-lite

Redmi Watch 2 Lite एक स्मार्ट बँड म्हणून काम करते. परंतु, यातील फीचर्स मध्ये SpO2 ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर, मँट्रुअल ट्रॅकर आणि स्लीप ट्रॅकर दिले आहे. सेफ्टी मध्ये यात 5ATM वॉटर रेसिस्टेंट बिल्ड दिले आहे. ही वॉच १२० हून जास्त वॉच फेसला सपोर्ट करते. कलर ऑप्शन मध्ये ही अनेक कलर्स मध्ये उपलब्ध आहे. या वॉचची भारतातील किंमत ३ हजार ४९९ रुपये आहे.

वाचाः iPhone 13 mini ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी, पाहा बेस्ट ऑफर

​Fire-Boltt Ring 3

fire-boltt-ring-3

Fire-Boltt Ring 3 ब्लूटूथ कॉलिंग सोबत अनेक वॉच फेस देते. सर्वात जबरदस्त फीचर्स पैकी एक आहे. यूजर्सला डायल फिरवून वॉलपेपर किंवा फेस बदलू शकते. स्मार्टवॉच व्हाइस असिस्टेंट देते. अन्य प्रमुख फीचर्स मध्ये एक कॅलक्यूलेटर आणि गेम आहे. सेफ्टीसाठी यात SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटर दिले आहे. या वॉचची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स, पाहा फोनची लिस्ट आणि किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here