Redmi 10

Redmi 10 या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमला फ्लिपकार्टवरून ९ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. फोनला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्यास १० टक्के म्हणजेच २ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतो. याशिवाय, बँक बडोदा मास्टर कार्ड डेबिट कार्ड आणि फेडरल बँक क्रेडिट कार्डद्वारे ५ टक्के कॅशबॅक मिळतो. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवरून ट्रान्झॅक्शन केल्यास १ हजार रुपयाची सूट मिळते. रेडमीच्या या फोनला १६६७ रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकते. याशिवाय या फोनला एक्सचेंज केल्यास ५६५६ रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
वाचाः टेम्पर्ड ग्लासमध्ये 2D, 2.5D, 3D, 4D, 5D, 9D, 11D काय आहे?, दुकानदार कसं मुर्ख बनवतात, पाहा
Redmi 10 Specifications

Redmi 10 स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्ड द्वारे १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा व २ मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
वाचाः ३४ हजाराचा 5g स्मार्टफोन ८ हजार रुपये स्वस्त मिळतोय, पाहा बेस्ट डील
Infinix Note 12

Infinix Note 12 स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून ९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास तसेच बँक ऑफ बडोदा मास्टरकार्ड डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळते. हँडसेटला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड द्वारे सूट दिली जात आहे. या फोनाला १६६७ रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकते. याशिवाय, ५६५० रुपयाचे एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळते.
वाचाः Vodafone Idea ने लाँच केले २५ आणि ५५ रुपयाचे नवीन प्लान, डेटा आणि म्यूझिकची मजा मिळेल
Infinix Note 12 Specifications

Infinix Note 12 मध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि AI लेंस दिले आहे. हँडसेट मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G88 प्रोसेसर दिले आहे.
वाचाः iPhone 13 mini ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी, पाहा बेस्ट ऑफर
Realme C31

Realme C31 स्मार्टफोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड द्वारे खरेदी केल्यावर ५टक्के कॅशबॅकचा फायदा मिळतो. फोनला १६६७ रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः नवीन वर्षाआधीच घरी आणा जबरदस्त OnePlus स्मार्टफोन, मिळतोय १५,००० रुपयांचा ऑफ
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times