Top Tech Trends in 2023: जगभरातील टेक्नोलॉजीकडे पाहिले तर तोंडात बोटे घातल्याशिवाय राहवत नाही. अनेक अशक्य गोष्टी सुद्धा टेक्नोलॉजीमुळे शक्य झाल्या आहेत. २०२२ या वर्षात अनेक नवीन टेक्नोलॉजी आल्या असल्या तरी २०२३ हे वर्ष खऱ्या अर्थानं टेक्नोलॉजीचं असणार आहे. २०२२ मध्ये मोठ मोठ्या टेक्नोलॉजी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या गेल्या. परंतु, स्मार्टफोनमध्ये फार मोठी टेक्नोलॉजी पाहायला मिळाली नाही. परंतु, आता २०२३ चे काउंट डाउन सुरू झाले आहे. या नवीन वर्षात नवीन टेक्नोलॉजी पाहायला मिळणार आहे. Extended Reality, AI-बेस्ड टूल, फोल्डेबल फोन आणि रोबोट पर्यंत अनेक नवीन टेक्नोलॉजी पाहायला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी २०२३ मध्ये कोणकोणती टेक्नोलॉजी मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे, यासंबंधीची माहिती देणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

​Extended Reality

extended-reality

Extended Reality चा अर्थ VR, AR आणि MR यांच्याशी आहे. या ठिकाणी काही ब्रँड जसे मेटा हेडसेट द्वारे एक वेगळेच जग निर्माण करीत आहे. तर दुसरे ब्रँड मेटावर्स साठी वेगळा रस्ता शोधला जात आहे. २०२३ मध्ये आम्ही स्टार्ट अप आणि मोठ्या टेक कंपन्या दोन्ही मेटावर्ससाठी सोशल एक्सपीरियन्सचा भाग बनवून तो पुढे नेणार आहेत.

वाचाः टेम्पर्ड ग्लासमध्ये 2D, 2.5D, 3D, 4D, 5D, 9D, 11D काय आहे?, दुकानदार कसं मुर्ख बनवतात, पाहा

​3D इन्वायरनमेंट

3d-

या ठिकाणी काही कंपन्या व्हिज्युअल्स कंप्यूटिंग हार्टवेयर किंवा हेडसेट ऑफर करतील. तर दुसऱ्या कंपन्या सॉफ्टवेयर आणि कंटेट तयार करतील. यामुळे ग्राहकांना ३डी व्हर्च्युअल स्पेसमध्ये जबरदस्त ऑप्शन मिळेल. ज्यांच्याकडे सध्या काही कस्टमाइजेबल अवतार शिवाय, आणखी काही नाही. यामुळे स्टार्टअप कंपन्या सुद्धा हार्डवेयर, सॉफ्टवेयर, आणि 3D इन्वायरनमेंट मध्ये टूल क्रिएट करण्यासाठी पुढे येतील किंवा तशा संधी निर्माण करतील.

वाचाः करोनाची भीती वाढली, या ५ गॅझेट्सची पुन्हा आठवण झाली, आता स्वस्तात खरेदीची संधी

​CES इवेंट

ces-

जानेवारी २०२३ मध्ये आयोजित होणाऱ्या CES इवेंट मध्ये मेठे आणि छोटे ब्रँड आपले AR, VR आणि मिक्स्ड-रियलिटी हार्डवेयर रोडमॅप समोर आणतील. मेटाने आधीच मेटावर्स मध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा केली आहे. तर अॅपल कडूनही २०२३ च्या मध्यापर्यंत कमी किंमतीत हाय अॅड मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच करणार असल्याचे म्हटले आहे. सोनी सुद्धा फेब्रुवारी मध्ये PlayStation VR2 मध्ये या सेगमेंट मध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार आहे.

वाचाः फोनचा बॉम्ब स्फोटप्रमाणे होवू शकतो स्फोट, चुकूनही करू नका या चुका

​Artificial Intelligence (AI)

artificial-intelligence-ai

२०२२ च्या अखेर मध्ये आम्ही AI चॅटबॉटची झलक पाहिली आहे. यात सर्वात जास्त पॉप्यूलर ChatGPT झाले आहे. या टूलने एक्सपर्टला खूपच प्रभावित केले आहे. अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात जबरदस्त पद्धतीने ट्रेनिंग मिळवल्यानंतर हे टूल अनेक कामात व्यक्तीची जागा घेवू शकते. OpenAI चे चॅट जीपीटी आपल्या वैशिष्ट्ये शिवाय, आगामी भविष्यात झलक दाखवू शकतात. Artifical Intelligence (AI) २०२३ मध्ये सर्वात मोठे ट्रेंड सिद्ध होईल, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

वाचाः iPhone 13 mini ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी, पाहा बेस्ट ऑफर

​AI आणखी पॉवरफुल होणार

ai-

यात आणखी एक खास बाब म्हणजे AI आधी टेक एक्सपीरियन्सचा भाग आहे. परंतु, आता त्याला अशा अॅप्लिकेशनमध्ये आणले जात आहे, जे थेट यूजर्सशी संबंधित असेल. एक्सपर्ट्सचा अंदाज आहे की, २०२३ मध्ये रिलीज होणारा AI टूल आधीच्या तुलनेत खूप शक्तिमान आणि पॉवरफुल असणार आहे. हे व्यक्तीसारखे टेक्स्ट जनरेट करण्याशिवाय, नैसर्गिक ह्यूमन लँग्वेज सुद्धा समजू शकतो. म्हणजेच तुम्हाला आगामी काळात AI-बेस्ड टूलद्वारे स्क्रीप्ट आणि निंबध मिळू शकतात. परंतु, काही लोक या टूलच्या विरोधात आहेत. जसे, शिक्षक, यांच्या म्हणण्यानुसार, AI आल्यानंतर अकादमी निबंध जे विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करते. ते संपेल. याशिवाय, प्रायव्हसी आणि Lensa AI सारख्या अॅप्सद्वारे महिलांची सेक्सअलायझेशन सारखी चिंता वाढू शकते.

वाचाः Nothing Phone 1 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा ऑफर

​रोबोट बनतील व्यक्ती

२०२३ मध्ये रोबोट अनेक कामे करू शकतील जे सध्या व्यक्ती करतात. परंतु, रोबोट १९५६ पासून वर्कप्लेस वर काम करीत आहेत. अनेक इंडस्ट्री जसे शेती आणि कंस्ट्रक्शन, ज्या ठिकाणी लेबरची कमी आहे. त्या ठिकाणी रोबोट खूप आधीपासून काम करीत आहे. आता ही प्रक्रिया आणखी पुढे जाण्यासाठी तयारीत आहे. रोबोट आज जॉब करीत आहेत. हे व्यक्तीसाठी धोक्याची घंटा आहे. उदाहरणासाठी, लीडिंग रोबोटिक्स डेव्हलपर बिल लोवेलने अशा रोबोटिक आर्म टेक्नोलॉजी तयार केली आहे. जे इमारतीची स्वच्छता पासून परिसरात पसरलेला कचरा स्वच्छ करण्याचे काम करते. रोबोटिक आर्म्स, इंडस्ट्रियल रोबोटिक एक पॉप्यूलर फॉर्म आहे.

वाचाः आधीच स्वस्त, त्यात डिस्काउंट; रेडमी, रियलमीसह हे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

आणखी एक नवीन रिसर्च

गेल्या काही वर्षात रोबोटला नवीन फिल्डमध्ये एक्सपांड केले जात आहे. ज्यात तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नसेल. हे करणे अशक्य होते. ऑस्ट्रेलिया मध्ये Monash University मधील एका रिसर्च टीम एका रोबोटवर काम करीत आहे. हा रोबोट सफरचंद तोडू शकतो. या रोबोट मध्ये AI चा वापर करण्यात आला आहे. हा रोबोट अनेक छोटी मोठी कामे करतो. आता हे रोबोट खूप सर्व काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात रोबोट माणसाची जागा घेणार हे नक्की आहे.

वाचाः २०२२ मधील बेस्ट स्मार्टफोन्स, किंमत १० हजार ते ८० हजारांपर्यंत, पाहा लिस्ट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here