Moto Edge 30

Moto Edge 30: जर तुमचे २५,००० रुपयांपर्यंतचे बजेट असेल, तर ३४,९९९ रुपयांचा हा फोन २४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मोटो एज ३० मध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्लस प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो एज ३० बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB सह उपलब्ध आहे. तसेच, फोनमध्ये ५० MP + ५० MP + २ MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे आणि ३२ MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइस जलद चार्जिंग सपोर्टसह ४०२० mAh बॅटरी पॅक करते आणि मोठा ६.५५ -इंचाचा डिस्प्ले देखील यात मिळतो.
वाचा: Jio चे 5G नेटवर्क येत नाहीये ? फॉलो करा या सोप्या टिप्स, मिळवा भन्नाट स्पीड
Samsung Galaxy F23

Samsung Galaxy F23: तुमचे बजेट १५,००० रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला एक शक्तिशाली 5G फोन घ्यायचा असेल, तर तुम्ही Galaxy F23 चा विचार करू शकता. २३,९९९ रुपयांऐवजी सॅमसंग गॅलेक्सी F23 फोन सेलमध्ये १५,९९९ रुपयांना खरेदी करता येईल सॅमसंग गॅलेक्सी F23 यामध्ये ६.६ -इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, यात मोठी ५००० mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देखील आहे. सॅमसंग गॅलेक्सी F23 फोनमध्ये ५० MP + ८ MP + २ MP प्राथमिक कॅमेरा युजर्सना मिळेल. आणि ८MP सेल्फी कॅमेरा देखील यात आहे.
वाचा : अवघ्या ७०० रुपयांत घरी येईल हा Realme स्मार्टफोन, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा, पाहा ऑफर
Apple iPhone 13

Apple iPhone 13: आयफोन कमी खर्चात खरेदी करण्याचा विचार असेल तर, Apple आयफोन 13 वर उपलब्ध डील तुमच्यासाठी बेस्ट आहे. Apple iPhone 13 सेल दरम्यान ६९,९०० रुपयांऐवजी ६१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफर्स व्यतिरिक्त, यावर १७,५०० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील दिले जात आहे. फोनमध्ये ६.१-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले व्यतिरिक्त डिव्हाइसमध्ये १२ MP + १२ MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि १२ MP फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे. Apple A15 बायोनिक चिप प्रोसेसर फोनमध्ये मजबूत कामगिरीसाठी उपलब्ध आहे.
Google Pixel 6A

Google Pixel 6a : सेलमध्ये Google Pixel 6a वर देखील भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. तुम्हाला कमी किमतीत उत्तम कॅमेरा असलेला फोन घ्यायचा असेल, तर Google Pixel 6a हा सर्वोत्तम पर्याय आहे. सेलमध्ये Google Pixel 6a ४३,९९९ रुपयांऐवजी २९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. एक्सचेंज आणि बँक ऑफरसह, त्याची किंमत २०,००० रुपयांच्या खाली येईल. Google Tensor प्रोसेसर व्यतिरिक्त, यात १२.२ MP + १२ MP प्राथमिक कॅमेरा आणि ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याची ४४१० mAh बॅटरी जलद चार्जिंग सपोर्टसह येते.
Samsung Galaxy S22+

Samsung Galaxy S22 Plus : सेलमध्ये दक्षिण कोरियाच्या टेक कंपनीचा दमदार फोन १०१,९९९ रुपयांऐवजी ६९,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटसह, त्याची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते. Galaxy S22 Plus 5G ला 128 GB स्टोरेजसह Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 8GB रॅम आणि ५० MP ट्रिपल कॅमेरासह १० MP फ्रंट कॅमेरा मिळतो. ६.६ इंच फुल एचडी + डिस्प्ले असलेल्या फोनमध्ये ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे.
वाचा : यावर्षी चर्चेत राहिलेले Dark Web नक्की काय? त्यावर कसा विकला जातो युजर्सचा डेटा ,जाणून घ्या
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times