New Year Offer: जर तुम्हाला आयफोन आवडत असेल आणि नवीन वर्षात तो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या iPhone 14 Plus देशभरातील इमॅजिन स्टोअर्सवर (Imagine Stores) 9,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. ही सूट iPhone 14 Plus च्या 128GB आणि 256GB या दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे. ही ऑफर सध्या इमॅजिन वेबसाइटवर उपलब्ध नाही, याचा अर्थ ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इमॅजिन स्टोअरला भेट द्यावी लागेल. यातच जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने खर्डी केली, तर त्यावरही तुम्हाला सूट मिळणार आहे.

Apple iPhone 14 Plus gets heavy discount: 9000 हजारांची करा बचत 

iPhone 14 Plus च्या 128GB आणि 256GB मॉडेल्सची किंमत 89,900 रुपये आणि 99,900 रुपये आहे. तुम्ही 128GB मॉडेल 81,900 रुपयांमध्ये करू शकता आणि HDFC बँक कार्डवर  3,000 रुपयांच्या स्टोअर डिस्काउंट आणि रु 5,000 इन्स्टंट कॅशबॅकनंतर. तर फोनचे 256GB मॉडेल 90,900 रुपयांमध्ये 4,000 रुपयांच्या इन्स्टंट स्टोअर डिस्काउंट आणि 5,000 रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅकनंतर उपलब्ध आहे. याशिवाय या ऑफरमध्ये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.  iPhone 14 Plus वर सध्या कोणतीही एक्सचेंज ऑफर नाही.

Apple चा हा iPhone 14 Plus आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीने सुसज्ज आहे. अॅपलने 5 वर्षांनंतर आपल्या फोनमध्ये ‘प्लस’ सीरिज परत आणली आहे. शेवटची ‘प्लस’ सीरिज आयफोन 8 प्लस होती, जी 2017 मध्ये लॉन्च झाली होती. आयफोन 14 प्लस 6.7-इंचाच्या सुपररेटिना XDR डिस्प्लेसह येतो. हे अॅपलच्या स्वतःच्या A15 बायोनिक प्रोसेसरवर चालते. फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो ज्यात 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंट समाविष्ट आहेत. हा फोन सध्या ब्लू, स्टारलाइट, मिडनाईट ब्लॅक, पर्पल आणि प्रॉडक्ट रेड कलर ऑप्शनमध्ये मिळतो.

Apple iPhone 14 gets heavy discount: iPhone 14 वर ही मिळत आहे सूट 

जीबी स्टोरेजमध्ये iPhone 14 वर मोठी सूट मिळत आहे. Apple च्या अधिकृत वेबसाइटवर iPhone 14 च्या 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,900 रुपये आहे. तर तेथे 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 89,900 रुपये आणि 512 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 1,09,900 रुपये ठेवण्यात आली आहे. आता तुम्ही येथून HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून iPhone 14 वर 6,000 रुपयांपर्यंत झटपट कॅशबॅक मिळवू शकता. याशिवाय ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर ट्रेड-इनच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला iPhone 14 वर 2,200 ते 58,730 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

live reels News Reels

 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here