मुंबई, 4 जानेवारी : गूगलचं मेसेजिंग अ‍ॅप Allo लाँच झाल्यानंतर ते 2018 मध्ये बंद करण्यात आलं. आता हे अ‍ॅप आता सुरू नाही पण तरीही काहीजणांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप अजूनही डाऊनलोड केलेलं आहे. पण यामुळे तुमच्या फोनला धोका पोहोचू शकतो.

हुवावे कंपनीच्या स्मार्टफोनच्या युजर्सच्या फोनवर एक मेसेज फ्लॅश होतो. तुमच्या फोनमध्ये व्हायरस शिरला आहे आणि त्यामुळे हे अ‍ॅप फोनमधून लगेच डिलीट करणं गरजेचं आहे, असा तो मेसेज आहे.

अँड्रॉइड ऑथॉरिटीवर आलेल्या बातमीनुसार Google Allo बद्दल अशी वॉर्निंग Huawei P20 Pro सोबत Huawei Mate Pro वरही आलीय. हुवावे फोनमध्ये Allo हे अ‍ॅप सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याचं मानलं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here