Iphone News: नववर्षाच्या निमित्ताने अनेक स्मार्टफोन कंपन्या नवनवीन मोबाईल लॉन्च करत आहेत. आज Poco ने अधिकृतपणे आपला Poco C50 लॉन्च केला आहे. या महिन्यात एकामागोमाग एक अनेक उत्तम स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. नवीन स्मार्टफोन्सबद्दल ग्राहकांमध्येही उत्सुकता आहे. मात्र याच दरम्यान अॅपलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मार्च महिन्यापासून आयफोन 13 पेक्षा जुन्या मॉडेलच्या सर्व वापरकर्त्यांसाठी बॅटरी बदलणे महाग होईल. विशेषत: ज्या मोबाईल फोनची वॉरंटी संपली आहे, त्यांची बॅटरी बदलणे खूप महाग होईल. यातच ज्यांनी आयफोन 14 सिरीज खरेदी केली आहे, त्यांना यापासून दिलासा मिळाला आहे.

जर तुमच्या आयफोनची बॅटरी खराब झाली असेल किंवा बॅटरी बॅकअप चांगला मिळत नसेल, तर ती वेळेत बदला कारण मार्च महिन्यापासून नवीन दर लागू होणार आहेत. 1 मार्च 2023 पासून, iPhone 14 च्या आधीच्या सर्व iPhone मॉडेल्ससाठी आउट-ऑफ-वारंटी बॅटरी सेवा शुल्क 1,654 रुपयांनी वाढवले ​​जाईल.

Iphone Battery Replacement Cost India: सध्या आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी लागणार इतके पैसे 

अॅपल कंपनी बहुतेक आयफोन मॉडेल्सवर बॅटरी बदलण्यासाठी 6 ते 7,000 रुपये आकारते. 1 मार्चपासून ही फी 8,000 किंवा 8,500 रुपयांपर्यंत वाढू शकते. तसेच iPhone SE, iPhone 8 किंवा जुन्या मॉडेल्सची बॅटरी बदलण्यासाठी 1 मार्चपासून ग्राहकांना 6,000 रुपये द्यावे लागतील. सध्या या मॉडेल्समध्ये बॅटरी बदलण्याची किंमत 4,000 रुपयांपर्यंत आहे.

ज्यांनी त्यांच्या आयफोनसाठी Apple केअर किंवा Apple केअर प्लस प्लॅन घेतला आहे, त्यांना काही फरक पडणार नाही. परंतु ज्यांनी हे प्लॅन घेतलेले नाहीत आणि त्यांचे डिव्हाइस वॉरंटी संपले आहे, त्यांना मार्चपासून बॅटरी बदलणे महाग होईल. अॅपल केअर प्लस प्लानमध्ये ग्राहकांना बॅटरी बदलण्याची सुविधा मोफत मिळते.

live reels News Reels

Iphone 15 Launch Date in India: iPhone 15 या वर्षी लॉन्च होणार आहे

Apple या वर्षी iPhone 15 सीरीज लॉन्च करू शकते. iPhone 15 सिरीज a17 बायोनिक चिपसेट दिला जाईल. माहितीनुसार, हा चिपसेट a16 बायोनिकपेक्षा 35 टक्के वेगवान असेल.

इतर बातम्या: 

Tunisha Sharma : शो मस्ट गो ऑन… तुनिषाच्या निधनानंतर ‘अली बाबा : दास्तान – ए काबुल’ मालिकेच्या शूटिंगला सुरुवात; जाणून घ्या सेटवरचं वातावरण कसं आहे?

technology

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here