नवी दिल्लीः आयडिया कंपनीने आपल्या युजर्ससाठी खास गुड न्यूज दिली आहे. कंपनीने सर्व Idea Nirvana पोस्टपेड कंपनीच्या ग्राहकांना (Vodafone Red) प्लान अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामुळे वोडाफोन – आयडिया च्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना एक सारखी सर्विस मिळणार आहे. तसेच आयडिया ग्राहकांना काही जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. याची घोषणा कंपनीने फेब्रुवारीत केली होती.

वाचाः

कंपनीने बुधवारी घोषणा केली आहे की, पोस्टपेड प्लानचे कन्सॉलिडेशन प्रोसेस पूर्ण झाले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आता वोडाफोन प्रमाणे आयडिया सब्सक्रायबर्स सुद्धा वोडाफोन रेड प्लानचा फायदा घेऊ शकतात. यामुळे एक सारखी कस्टमर सर्विस आणि जबरदस्त डिजिटल अनुभव मिळणार आहे.

वाचाः

या सुविधा मिळणार
नवीन सुविधा अंतर्गत जुन्या आयडिया पोस्टपेड युजर्संना आता रेड फॅमिली सब्सक्रिप्शनचा लाभ मिळणार आहे. ज्यात पूर्ण कुटुंबाचे बिल येते. तसेच वोडाफोन प्ले सर्विसचा फायदा मिळणार आहे. युनिफॉर्म कस्टमर सर्विस अंतर्गत आयडिया युजर्स सुद्धा वोडाफोन अॅप IVR, USSD आणि वेबसाइटचा वापर प्रोडक्ट सर्विस आणि पेमेंट करण्यासाठी करू शकतील.

वाचाः

सर्वात वेगवान मायग्रेशनपैकी एक
वोडाफोन आयडियाने मायग्रेशनची प्रक्रिया मुंबईतू सुरू केली आहे. गुजरात, बिहार, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा यासारख्या सर्कलमध्ये आधीपासूनच पहिल्या फेज अंतर्गत रोलआऊट सुरू केले आहे. पोस्टपेड कन्सॉलिडेशन पूर्ण झाल्यानंतर वोडाफोन आयडियाचे चीफ टेक्नोलॉजी अधिकारी विशांत वोराने सांगितले की, ही टेलिकॉम जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगवान मायग्रेशपैकी एक आहे. आमच्या दोन्ही प्रमाणे पोस्टपेड ग्राहकांना एक समान सर्विस मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here