Samsung Galaxy F04 Launched in India: मागील महिन्यात Samsung Galaxy M04 लॉन्च केल्यानंतर Samsung ने भारतीय बाजारात आणखी एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आहे Samsung Galaxy F04. सॅमसंगचा नवीन F-सिरीज स्मार्टफोन Galaxy M04 सारखाच आहे. Samsung Galaxy F04 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 8 GB पर्यंत RAM आहे. F-सिरीज स्मार्टफोनमध्ये 13MP कॅमेरा आणि मोठा HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटच्या इतर फीचर्समध्ये 5000mAh बॅटरी युनिट, 5MP सेल्फी कॅमेरा, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि 2 Android OS अपग्रेड यांचा समावेश आहे. Samsung Galaxy F04 Redmi 10A, Realme C33 आणि Infinix Hot 20 Play शी स्पर्धा करेल.

Samsung Galaxy F04: किंमत 

4GB + 64GB कॉन्फिगरेशनसाठी Samsung Galaxy F04 ची भारतात किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली (बँक ऑफरसह) आहे. हँडसेटची विक्री 12 जानेवारीपासून केवळ फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.

Samsung Galaxy F04: स्पेसिफिकेशन 

नवीन Galaxy F04 HD+ (1600 × 720 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 269ppi पिक्सेल Density सह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले मिळतो. याचा 60Hz रिफ्रेश रेट आहे. जो वॉटरड्रॉप नॉचसह येतो. नवीन F-सिरीज स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन 4 GB RAM सह येतो आणि तुम्हाला RAM Plus फीचर्स (Samsung च्या Virtual RAM द्वारे) पहायला मिळते. स्मार्टफोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 बूट करतो. ब्रँड Galaxy F04 साठी दोन Android व्हर्जन अपग्रेडची योजना देखील करत आहे. या नवीन हँडसेटमध्ये मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देखील आहे.

Samsung Galaxy F04: फीचर्स 

सॅमसंगचा नवीन F-सिरीज स्मार्टफोन 5000mAh बॅटरी युनिटने सुसज्ज आहे. हा टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोन ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅशचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी सॅमसंगने हँडसेटमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

live reels News Reels

Samsung Galaxy F04: रंग पर्याय 

Samsung Galaxy F04 दोन रंग पर्यायांमध्ये येतो – जेड पर्पल आणि ओपल ग्रीन. याचे वजन 188 ग्रॅम आहे. डिव्हाइसमध्ये चमकदार फिनिश आहे. F-सिरीज स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. मात्र हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. हँडसेटवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-सिम, 4जी, वायफाय 802.11, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएसचा समावेश आहे.

 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here