वाचाः
अॅमेझॉनवर आलेल्या एका टीझरवरून ही माहिती समोर आली आहे. ऑनर 9A स्मार्टफोनची लाँचिंग ३१ जुलैला केली जावू शकते. या दोन्ही फोनला ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. रशियात ऑनर ९ ए ची किंमत १० ९९० रबल (११ हजार २०० रुपये) आहे.
वाचाः
Honor 9A चे वैशिष्ट्ये
अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ६.३ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. याचा रेजॉलूशन 720×1600 पिक्सल आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर, 3 जीबीचा रॅम आणि 64 जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. ऑनर 9A मद्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. हा सेटअप 13MP + 5MP + 2MP असेल. तर सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
Honor 9S चे वैशिष्ट्ये
हा फोन साईजमध्ये छोटा असू शकतो. फोनमध्ये ५.४५ इंचाचा डिस्प्ले मिळेल. याचे रिझॉल्यूशन 720×1440 पिक्सल आहे. यात ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज दिला जाणार आहे. ऑनर 9S मध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळू शकतो. तो ८ मेगापिक्सलचा असू शकतो. सेल्फी साठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी 3020mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times