How to Make Strong Password : बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानानुसार, अनेक गोष्टींमध्ये बदल होत गेले आहेत. या टेक्नॉलॉजीमुळे अनेक गोष्टी अगदी सहज उपलब्ध झाल्या. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटर यांसारख्या गॅजेट्सचा वापर करून आपण आपली फाईल सेव्ह करतो. या फाईल सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपल्या गॅजेट्समध्ये पासवर्ड ठेवतो. मात्र, अनेकदा तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग नसल्या कारणाने तो सहजपणे हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे असे होणारे प्रकार टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील? या संदर्भात काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. 

स्ट्रॉंग पासवर्डसाठी ‘ही’ पद्धत फॉलो करा : 

  • स्ट्रॉंग पासवर्ड, पटकन कोणाच्या लक्षात येणार नाही असा पासवर्ड तयार करणे फार गरजेचं आहे. याच कारणासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. जेणेकरून तुमचा पासवर्ड सुरक्षित राहील.
  • पासवर्ड तयार करताना सांकेतिक चिन्हांचा वापर करा. सिंगल शब्द त्यामध्ये काही बदल करून ठेवा जेणेकरून ते सहजपणे कोणाला ओळखता येणार नाही. या शब्दांमध्ये जर तुम्ही सांकेतिक चिन्हाचा वापर केला तर तुमचा पासवर्ड अधिक सुरक्षित राहील. 
  • एक लक्षात ठेवा की, सांकेतिक शब्दांचा वापर आणि लॉंग पासवर्ड ठेवा. लॉंग पासवर्ड असेल तर तो छोट्या पासवर्डपेक्षा कोणाला हॅक करण्यास कठीण जातो. 
  • Multi Factor Authentication चा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा वापर करा. 
  • एकच पासवर्ड अनेकवेळा अनेक ठिकाणी वापरू नका. जसे की, सिस्टीम, वेबसाईट, अकाऊंट्स. या प्रत्येकासाठी वेगळा पासवर्ड ठेवा. 
  • कोणत्याही भाषेत किंवा डिक्शनरीमध्ये सहज उपलब्ध असेल असा शब्द तुम्ही पासवर्डमध्ये वापरू नका. तसेच, एकाच शब्दाचा उल्लेख पासवर्डमध्ये अनेकदा करू नका. 
  • एक गोष्ट लक्षात ठेवा की, पासवर्ड तयार करताना वैयक्तिक माहितीचा उल्लेख पासवर्डमध्ये करू नका. यामध्ये तुमचा वाढदिवस, सोशल सिक्युरिटी, तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, नाव किंवा कुटुंबातील सदस्यांचं नाव तुमच्या पासवर्डमध्ये येता कामा नये. 

महत्त्वाच्या बातम्या : 

ATM PIN : फक्त 4 अंकीच नाही तर 6 अंकीही असतो पिन; कोणता पिन अधिक सुरक्षित?

live reels News Reels

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here