5G Network भारतात वेगाने पसरवले जात आहे. Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या दररोज देशातील कोणत्या ना कोणत्या शहरात आपली ५जी सर्विस सुरू करीत आहेत. मोबाइल यूजर्सला सुपरफास्ट 5G Internet Speed देण्याचा दावा करीत आहेत. यात किती लोकांना जबरदस्त 5G Services मिळत आहे, याची आकडेवारी अजून समोर यायची बाकी आहे. परंतु, ५जी नेटवर्क आल्यापासून ४जी नेटवर्क मध्ये समस्या येत आहे. सध्या ४जी सेवा खूपच खराब सुरू आहे. लो नेटवर्क कव्हरेज, स्लो इंटरनेट, तसेच कॉल ड्रॉप सारखी समस्यांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. देशात अनेक ठिकाणी 4G Network मध्ये समस्या येत आहे. Jio आणि Airtel नंबरवर लो नेटवर्क, स्लो इंटरनेट तसेच कॉल ड्रॉपची समस्या पाहायला मिळत आहे. अनेक ग्राहकांकडून आरोप केला जात आहे की, 5G च्या चक्करमध्ये 4G सेवा खराब होत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

​4G Services मध्ये येतेय समस्या

4g-services-

रिलायन्स जिओ आणि एअरटेल कस्टमर्सला खराब ४जी सेवेचा सामना करावा लागत आहे. ज्यावेळी अन्य मोबाइलवर बोलणे सुरू आहे. त्यावेळी अनेक जण याला सामोरे जात आहे. मागील आठवड्यात मोबाइल सेवेवर खूप परिणाम झाला होता. यूजर्सला नेटवर्क आणि इंटरनेट दोन्हीच्या क्वॉलिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मोबाइल मध्ये सिग्नल खूप कमी येत आहे. अनेकदा सिग्नल असूनही इंटरनेट डेटा कनेक्टिविटी मिळत नाही.

वाचाः ChatGPT च्या मदतीने मुलं करत होते होम वर्क, शिक्षण विभागाने बंदीच घातली, पाहा डिटेल्स

​कॉल ड्रॉपने जिओ आणि एअरटेलचे यूजर त्रस्त

डिसेंबर २०२२ पासून Reliance Jio आणि Airtel कस्टमर्सला कॉल ड्रॉपची समस्या येत आहे. आपल्या स्वतःचा अनुभव विचारल्यानंतर अनेकांनी नंबरवर कॉल करण्यास वेळ लागत असल्याचे म्हटले आहे. अनेकांना कॉल कनेक्ट करण्यास अडचण येत आहे. जर फोन लागला तर मध्येच कॉल कट होत आहे. हा कॉल ड्रॉपचा प्रोब्लेम वारंवार येत आहे. ज्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत. फोनवर बोलत असताना व्हाइस क्वॉलिटी सुद्धा व्यवस्थित येत नाही.

वाचाः Samsung याच महिन्यात भारतात लाँच करणार Galaxy A14 चे तीन स्मार्टफोन, पाहा फीचर्स

​इंटरनेट चालत नाही

लो नेटवर्क कव्हरेज व कॉल ड्रॉप सारखी समस्या सोबत मोबाइल यूजर्सला इंटरनेट संबंधी समस्या येत आहे. 4G recharge plan असूनही स्मार्टफोन वर 3G हून कमी इंटरनेट स्पीड मिळत आहे. फोनमध्ये इंटरनेट कनेक्टेड दिसत असले तर ब्राउजर ओपन केल्यास साइट ओपन होण्यास उशीर लागत आहे. काही यूजर्सला तर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI Apps सुद्धा ओपन होण्यास अडचण येत आहे.

वाचाः टेलिकॉम कंपन्यांचं ठरलंय, प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान महाग करणार, पाहा डिटेल्स

​5G चं महत्त्व वाढवण्यासाठी 4G सेवा खराब?

5g-4g-

वारंवार नेटवर्क मध्ये समस्या येत आहे. ही समस्या अनेक परिसरात येत आहे. त्रस्त झालेले यूजर्सला कळत नाही की, या समस्येनंतर काय करायचे. जिओ आणि एअरटेल सारख्या टेलिकॉम ऑपरेटर आपल्या नेटवर्कला ५जी वर अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रक्रियामुळे कंपनीचे ४जी नेटवर्कमध्ये समस्या येत आहे. सर्वात आधी, सर्वात जास्त आणि सर्वात फास्ट ५जी सर्विस देण्याच्या प्रयत्नात ही समस्या येत आहे का, याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

वाचाः १ लाखाचा MacBook Air मिळतोय २० हजारांनी स्वस्त, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here