Budget Smartphones : युजर्समध्ये आता पूर्वीप्रमाणे महागड्या फोनची क्रेझ नाही. आता प्रत्येकजण स्वस्तात चांगला फोन शोधत असतो. सामान्यतः चांगल्या फोनचे बजेट १०,००० ते २०,००० दरम्यान मानले जातात . पण, तुम्हाला माहित आहे का ? १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीतही सध्या बाजारात असे अनेक फोन उपलब्ध आहेत, जे लूक आणि डिझाइनमध्ये महागड्या स्मार्टफोन्सना जोरदार टक्कर देतात. तुम्हालाही कमी किमतीत चांगला फोन घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला ८००० रुपयांपर्यंतच्या काही स्मार्टफोन बद्दल सविस्तर सांगणार आहोत. या यादीमध्ये फक्त तेच फोन समाविष्ट करण्यात आले आहेत, जे किमतीच्या श्रेणीनुसार बाजारात खूप चांगले आहेत. तसेच, फीचर्सच्या बाबतीतही जबरदस्त आहे. लिस्टमध्ये .Motorola e32s, Redmi A1, POCO C31, Tecno Spark 9 सारख्या फोनचा समावेश आहे. या फोन्सवर एक नजर टाका आणि स्वतःसाठी खरेदी करा स्वस्तात मस्त फोन.

Tecno Spark 9

tecno-spark-9

Tecno Spark 9: टेक्नोस्पार्क तुम्हाला उच्च दर्जाच्या स्मार्टफोनची सर्व वैशिष्ट्ये परवडणाऱ्या किमतीत देतो. जर तुम्हाला सामान्य गेमिंग करण्यासाठी स्वस्त मोबाईल फोन घ्यायचा असेल तर, तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. हा स्मार्टफोन Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला 4 GB रॅम मिळेल. आजच्या तारखेत बजेट फोननुसार, तो गेमिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. या फोनमध्ये 64GB स्टोरेज देखील देण्यात आले आहे. यात सेल्फीसाठी वाटरड्रॉप स्टायल नॉच दिले आहे. या फोनची किंमत सध्या अमॅझॉनवर ७९९९ रुपये आहे.

वाचा:Samsung Galaxy M13 वर मिळतेय सुपरहिट ऑफर, आतापर्यंत २० लाख ग्राहकांनी केला खरेदी फोन

Poco C31

poco-c31

POCO C31 : 4 GB रॅमसह येणारा हा फोन सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. यात 64GB स्टोरेज आहे. फोनच्या कॅमेराबाबत देखील तुम्हाला कोणतीही तक्रार नसेल. यात १३ MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि ५ MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. POCO C31 च्या स्क्रीनमध्ये ६.५३ -इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनची बॅटरी ५००० mAh ची आहे. दीर्घकाळ व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी हा फोन सर्वोत्तम आहे. फोनमध्ये MediaTek Helio G35 Processor देण्यात आले आहे. फोनची किंमत सध्या अमॅझॉनवर ८१९९ रुपये आहे.

वाचा: OnePlus चा पॉवरफुल 5G स्मार्टफोन झाला २२ हजारांनी स्वस्त, फोनचे फीचर्स लय भारी

Redmi A1

redmi-a1

Redmi A1: Redmi A1 हा स्वस्त आणि उत्तम दर्जाचा स्मार्टफोन आहे. या लो बजेट स्मार्टफोनमध्ये ३२ जीबी स्टोरेज आणि २ जीबी रॅम देण्यात आली आहे. फीचर्सवर नजर टाकली तर, या फोनची वैशिष्ट्ये वाईट नाहीत. हा फोन लेदर बॅकग्राउंड टेक्सचरसह येतो, ज्यामुळे तो खूप प्रीमियम लुकमध्ये दिसतो. या फोनची खास गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी. या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ टिकते. iBall कॅमेरा, ५००० mAh ची दीर्घ बॅटरी याचे प्लस पॉईंट्स आहेत. फोनची किंमत अमॅझॉनवर ६१९९ रुपये आहे.

Motorola e32s

motorola-e32s

Motorola e32s : Motorola e32s हा एक उत्तम आणि चांगला स्मार्टफोन आहे. बजेटनुसार त्यात दिलेले फिचर्सही खूप चांगले आहेत. Motorola e32s ची स्क्रीन साईज ६.५ इंच आहे. तसेच, Motorola e32s मध्ये एचडी प्लस व्हिडीओ क्वालिटीही उपलब्ध आहे. हा फोन Helio G70 प्रोसेसरने सुसज्ज आहे. डिस्प्ले गुणवत्ता १६ mp कॅमेरा आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फोनला खूप खास बनवते. फोनची किंमत सध्या अमॅझॉनवर ८०९९ रुपये आहे.

वाचा: OnePlus चा पॉवरफुल 5G स्मार्टफोन झाला २२ हजारांनी स्वस्त, फोनचे फीचर्स लय भारी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here