नवी दिल्लीः आपल्या युजर्संना फ्रीमध्ये 6GB डेटा देत आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फ्री डेटा कूपन्स ऑफर लाँच केले आहे. 6GB डेटा पर्यंत फ्री डेटा देणाऱ्या या ऑफरचा फायदा याच ग्राहकांना मिळेल. जे ग्राहक एअरटेल थँक्स अॅप वरून २१९ रुपयांच्या वरचा अनलिमिटेड प्लान्स रिचार्ज करतील. ही ऑफर केवळ काही निवडक युजर्ससाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. युजर्संना त्यांच्या रिचार्ज नंबरवर ऑफर जिंकण्याची माहिती एसएमएस वरून दिली जाणार आहे. युजर्संना ऑफर अंतर्गत बेनिफिट्स मिळवण्यासाठी त्याच दिवशी रिचार्ज करावा लागणार आहे.

वाचाः

८४ दिवसांपर्यंत वैधता असणार
ऑफर अंतर्गत युजर्संना ६ जीबी डेटा पर्यंत कॉम्प्लिमेंट्री डेटा मिळणार आहे. युजर्संना डेटा कूपन्स साठी हा डेटा मिळेल. याची वैधता ८४ दिवसांसाठी असणार आहे. एअरटेलच्या म्हणण्यानुसार, युजर्स अॅपमध्ये डेडिकेटेड ‘My Coupons’ सेक्शन मध्ये जावून कूपन्सवर क्लेम करू शकतात. एअरटेलचा २१९ रुपये, २४९ रुपये, २७९ रुपये, २९८ रुपये, २४९ रुपये, ३९८ रुपयांच्या प्लान रिचार्जवर १ जीबी डेटाचे २ कूपन मिळतील. म्हणजेच या पॅकमध्ये २ जीबी डेटा फ्री मिळणार आहे. याची वैधता २८ दिवसांची आहे.

वाचाः

एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्जवर ६ जीबी डेटा
३९९ रुपये, ४४९ आणि ५५८ रुपयांच्या प्लानवर युजर्संना १ जीबी डेटाचे चार कूपन मिळतील. याची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्रमाणे ५९८ रुपये, ६९८ रुपयांच्या प्रीपेड प्लान रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना १ जीबी डेटाचे ६ कूपन्स मिळतील. म्हणजेच, या प्लानमध्ये ६ जीबी डेटा मिळेल. याची वैधता ८४ दिवसांची आहे. एअरटेलने आपल्या टर्म अँड कंडिशन पेजमध्ये म्हटले की, दररोज ऑफर जिंकणाऱ्या विजेत्याच्या संख्येला कोणतीही मर्यादा नाही. परंतु, कॉन्टेस्ट दरम्यान एका युजरला एकदा विजेता घोषित केले जाईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here