Samsung Galaxy S23 : सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग आपली फ्लॅगशिप सीरीज Galaxy S23 कधी लॉन्च करेल याची प्रत्येकजण वाट पाहत होता. मात्र, आता प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने अखेरीस त्याच्या पुढील गॅलेक्सी अनपॅक्ड (Galaxy Unpacked) इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Galaxy S23 सीरीज लॉन्च करणार आहे. टेक जायंट 1 फेब्रुवारी रोजी सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे रात्री 10 वाजता हा इव्हेंट आयोजित करणार आहेत. 

Samsung Galaxy S23 लाँचची तारीख

लॉन्च इव्हेंट ऑनलाइन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून Samsung.com पाहता येईल. Galaxy S23 चा टीझरही समोर आला आहे. या टीझरमधून असे दिसून येते की सॅमसंग कंपनी गॅलेक्सीचा संपूर्ण फोकस या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर करत असल्याची माहिती आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स :

news reels

परफॉर्मन्स : Qualcomm Snapdragon 875

डिस्प्ले 6.8 inches (17.27 cm)

स्टोरेज 128 GB

कॅमेरा 108 MP + 10 MP + 10 MP + 12 MP + 0.3 MP

बॅटरी 5000 mAh

रॅम 12 GB

Galaxy S23 मध्ये 3900 mAh बॅटरी मिळेल, S23+ ला 4700 mAh चा मोठा बॅटरी पॅक मिळेल. दोन्ही स्मार्टफोन 25 W चार्जिंग सपोर्टसह येतील. अल्ट्रा स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh असेल, ज्यामध्ये 45 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

Samsung Galaxy S23 तपशील

लीकनुसार, Samsung Galaxy S23 आणि S23 Plus मध्ये OIS सह 50MP, 12-मेगापिक्सेल (अल्ट्रा-वाइड), आणि 10-मेगापिक्सेल (टेलीफोटो) ट्रिपल कॅमेरा युनिट मिळू शकतात. त्याच वेळी, Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 200MP कॅमेरा असेल, हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल, ज्यामध्ये 200-मेगापिक्सल कॅमेरा असेल. याशिवाय 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स, 10-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 10-मेगापिक्सलचा पेरिस्कोप झूम कॅमेरा असेल.

याशिवाय, स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 द्वारे आधारित आहे. कॅमेरा वगळता बाकीचे फिचर्स तिन्ही स्मार्टफोनमध्ये सारखेच असू शकतात. काही दिवसांतच कंपनी स्मार्टफोनचे अनेक व्हिडीओ आणि माहिती शेअर करणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

1500 रुपयांचा असो की 1.5 लाखांचा; आता प्रत्येक स्मार्टफोनचा असणार Type-C चार्जर; जाणून घ्या काय आहे कारण

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here